आष्टी ग्रा.प.च्या गाळे बांधकाम भ्रष्टाचाराची तपासणी करण्याचे निघाले आदेश

✒️राहुल डांगे(आष्टी,विशेष प्रतिनिधी)मो:-9511263095

आष्टी(दि.9एप्रिल):-गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आष्टी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या गाळे बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार गडचिरोली जिल्हा परिषदेचे उप -मुख्य कार्यपालन अधिकारी (ग्रा.प) यांनी चौकशीचे आदेश निर्गमित केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

आष्टी ग्रा.प. अंतर्गत सि.सी.रोड,नाली बांधकाम, 44 गाळे बांधकाम,गाळे नुतनीकरण-विस्तारीकरण करण्यात आले होते. सण 2019-2020 पर्यत केलेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे लक्षात येताच माहिती अधिकार कार्यकते जवाहर मासिकर यांनी चौकशीची मागणी केली होती.

त्यानुसार उप-मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी चौकशीचे आदेश पंचायत समितीला दिले होते. त्यानुसार चामोर्शी पंचायत समितीचा वतीने त्यांचे पत्र क्रमांक/जा.क्र./जीपग/सा.प्र.वि/पंचा/स्था-07/173/2021 दि.27/01./2021 चा संदर्भ घेऊन कारवाईस प्रारंभ झालेला आहे.या बांधकाम प्रकणात ग्राम सेवकसह कोण कोण सहभागी व दोषी आहेत. याकडे जनतेचे लक्ष केंद्रित झाले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED