चंद्रपूर जिल्ह्यात (दि.9एप्रिल) रोजी 24 तासात 342 कोरोनामुक्त 784 कोरोना पॉझिटिव्ह – नऊ कोरोना बधितांचा मृत्यू

59

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.9एप्रिल):-जिल्ह्यात मागील 24 तासात 324 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 784 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून नऊ बाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 31 हजार 952 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 27 हजार 260 झाली आहे. सध्या 4227 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 95 हजार 508 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 58 हजार 663 नमुने निगेटीव्ह आले आहेत.आज मृत झालेल्यामध्ये चिमूर येथील 52 वर्षीय पुरुष व वरोरा येथील 78 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला व 59 वर्षीय महिला, भद्रावती येथील 67 वर्षीय पुरुष, दुर्गापूर,चंद्रपूर येथील 49 वर्षीय पुरुष व 64 वर्षीय पुरूष, बल्लापूर येथील 68 वर्षीय महिला, ब्रम्हापूरी येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 465 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 422, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.आज बाधीत आलेल्या 784 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 197, चंद्रपूर तालुका 40, बल्लारपूर 64, भद्रावती 35, ब्रम्हपुरी 47, नागभिड 30, सिंदेवाही 22, मूल 19, सावली 16, पोंभुर्णा गोंडपिपरी 6, राजूरा 23, चिमूर 101, वरोरा 118, कोरपना 58, जीवती 1 व इतर ठिकाणच्या 7 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह आज(9एप्रिल) 229 नवीन कोरोना बाधित तर 71 कोरोनामुक्त

गडचिरोली(दि.9एप्रिल):- आज जिल्हयात 229 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 71 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 11831 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10513 वर पोहचली. तसेच सद्या 1193 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 125 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज एका नवीन मृत्यूमध्ये भूज तालुका ब्रम्हपूरी जिल्हा चंद्रपूर येथील 73 वर्षीय महिलेचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.86 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 10.08 टक्के तर मृत्यू दर 1.06 टक्के झाला.

नवीन 229 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 116, अहेरी तालुक्यातील 11, आरमोरी 17, भामरागड तालुक्यातील 17, चामोर्शी तालुक्यातील 15, धानोरा तालुक्यातील 5, एटापल्ली तालुक्यातील 9, कोरची तालुक्यातील 11, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 13, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 3, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 1 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 11 व इतर जिल्हयातील बाधितामध्ये 0 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 71 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 19, अहेरी 11, आरमोरी 7, भामरागड 11, चामोर्शी 3, धानोरा 2, एटापल्ली 1, कोरची 01, कुरखेडा 1, तसेच वडसा 15 येथील जणाचा समावेश आहे.

काल सायंकाळपर्यंत लसीकरणाचे तपशील – जिल्हयातील शासकीय 67 व खाजगी 2 अशा मिळून 69 बुथवर काल पहिला लसीकरणाचा डोज 3355 व दुसरा डोज 249 नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 43857 तर दुसरा डोज 10704 नागरिकांना देण्यात आला आहे.