वेल्हाणे येथील जयदीप लौखे-मराठे यांचा राजकारणातून काढता पाय समाजकार्य करणार असल्याची ग्वाही

26

✒️वेल्हाणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वेल्हाणे(दि.9एप्रिल):- धुळे जिल्ह्यात आपले वेगळी ओळख निर्माण करणारे शंभुसेना सामाजिक संघटनेचे धुळे जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष वेल्हाणे गावाचे सुपुत्र युवानेते मा.चि.जयदिप बन्सीलाल लौखे-मराठे यांनी राजकारणाला जय महाराष्ट्र करत समाजकार्य करणार असल्याच आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.त्यांनी काल दि.०७ एप्रिल २०२१ रात्री उशिरापर्यंत प्रसिद्धी पत्रके तयार केली. व आज रोजी त्यांनी ती सर्वत्र प्रसिद्ध करणार असल्याचं सांगितलं.

प्रसिद्धीपत्रकात त्यांनी शेतकरी सामान्य जनता व विद्यार्थ्यांसाठी आपण काम करू व कोणालाही मदत लागली, तर आपल्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मदत करू अशी ग्वाही त्यांनी दिली.जयदिप लौखे-मराठे यांनी आपली प्रसिद्धी पत्रक हे मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेत काढले असून त्यात त्यांनी आपण राजकारण सोडून समाजकार्य करणार आहोत. राजकारण हे आपण निर्माण केले होते, ते आपल्याला आपल्या मागच्या पिढिंपासून मिळाले नव्हते, म्हणूनच आज आपण स्वत:राजकारण सोडत आहोत. असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.