विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जावलीत नाचुन नाही तर वाचुन साजरी होणार – एकनाथ रोकडे

33

✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सातारा(दि.९एप्रिल):- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती १४ एप्रिल ला संपन्न होत आहे यानिमित्ताने यंदाच्या वर्षीही पुन्हा एकदा भीम जयंती महोत्सवावर मोठ्या प्रमाणात कोरना चा प्रादुर्भाव जाणवत असल्यामुळे भीम जयंती होईल का नाही याबद्दल संपूर्ण आंबेडकरी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे .जावली तालुक्यात दरवर्षी भीम जयंती आपण जय भीम फेस्टिवल जावली तसेच गावागावात संपन्न करत असतो परंतु यावर्षी कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे भीमजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करता येणार नाही.

त्यामुळे जावली तालुक्यातील तमाम भीम अनुयायांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली तालुका भारतीय बौद्ध महासभा जावली तालुका व समता सैनिक दल जावली तालुका या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या अधिकृत राजकीय , धार्मिक व सामाजिक मातृ संघटनेच्यावतीने आपल्याला नम्र आवाहन करण्यात येत आहे की बाबासाहेबांनी लिहलेल्या घटनेतील कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करुयात प्रत्येकाने आपल्या घरावर निळा झेंडा लावून तसेच वस्त्या वस्त्यांच्या चौकांमध्ये बाबासाहेबांची तसेच सर्व महापुरुषांची प्रतिमांचे पूजन व संविधानाचे वाचन करून शोषल डिस्टस्टींग चे पालन करून अभिवादन करुयात तसेच यावर्षी मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा संपूर्ण महाराष्ट्रात जाणवत असून जयंतीच्या निमित्ताने जयंती महोत्सव कमिटी व गावगावातील मंडळांनी रक्तदान शिबीर राबवण्याचे ठरवले आहे.
जयंती महोत्सवानिमित्त नुसते बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्या पेक्षा बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन भीम जयंती साजरी केली पाहिजे असे भावनिक अवाहन जावली तालुक्यातील तमाम आंबेडकरी समाज्याच्या वतीने करण्यात येत आहे .

प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी यावेळीची भीमजयंती अतिशय हर्ष उल्हास पद्धतीने साजरी न करता कुठलीही मोठी अभिवादन सभा गायन पार्टी कार्यक्रम तसेच प्रबोधनाचे कार्यक्रम हे १४४ कलम असल्यामुळे अशा कार्यक्रमाचे आयोजन न करता साध्या पद्धतीने साजरी करून स्थानिक प्रशासनाला सहकार्य करून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन करूया आणि पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात भीम जयंती महोत्सव साजरा करूया असे अवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे ,भारतीय बौद्ध महासभा जावली तालुका अध्यक्ष दशरथ कांबळे व समता सैनिक दल या बाबासाहेबांच्या तिन्ही मातृ संघटनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे .