पुसावंडी ते जांगदा रस्त्यावरील पुलीया बांधकामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न!

27

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.10एप्रिल):- धानोरा तालुक्यातील पुसावंडी ते जांगदा रस्त्यावरील पुलीया बांधकामाचे भूमिपूजन सोहळा जिल्हा परीषद उपाध्यक्ष श्री मनोहर पाटील पोरेटी यांच्या हस्ते करण्यात आले.सदर पुलीया बहु प्रतिक्षित असल्याने भरपुर छोटे मोठे १० गावे जोडणारा आहे. करिता त्या भागातील नागरिकांनी भरपुर दिवसापासून पुलीया मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली होती.

ती यानिमित्ताने मिटणार असल्याने सदर भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त करीत आहेत.या प्रसंगी जिल्हा परीषद सदस्य श्री विनोद लेनगुरे, बंडु जी किरंगे सदस्य ग्राम पंचायत सोडे, रसिका पोरेटी सरपंच जांगदा, प्रशांत कोराम तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस, माणिक किरंगे सदस्य ग्राम पंचायत सोडे, कोडाप साहेब अभियंता मसराम मॅडम अभियंता, नगराळे मॅडम अभियंता, शालू गेडाम ग्रामसेविका, नरेश कल्लो व भागातील नागरिक उपस्थित होते.