बिलोली-देगलुरचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान दु:खद निधन

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.10एप्रिल):-देगलुर मतदार संघाचे विद्यमान आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर वय 63 वर्षे यांचे दिनांक 9 एप्रिल 2021 रोजी मध्यरात्री नंतर मुंबई येथे उपचार सुरू असताना निधन झाले असुन त्यांना गेल्या 25 दिवसापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहीती त्यांच्या निकटवर्तियाकडून मिळाली आहे.आमदार अंतापूरकर हे गेल्या 25 दिवसापूर्वी कोरोना बाधित झाले होते.तेव्हा स्वत: त्यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले होते.भगवती रूग्णालय नांदेड येथे 3 दिवस उपचार घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पूढील उपचारासाठी मुंबई येथील बॉम्बे हॉस्पीटल येथे अँडमिट करण्यात आले.

देगलुर- बिलोली विधानसभेचे आमदार रावसाहेब अंतापूरकर हे सार्वजनिक बांधकाम विभागात व्द्युत अभियंता म्हणुन यशस्वी जबाबदारी निभावली.यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेऊन कॉग्रेस पक्षात प्रवेश केला.यानंतर सन 2009 मध्ये देगलुर मतदार संघातुन निवडणुक लढविली पहील्याच टर्ममध्यो आमदार म्हणुन निवडूण आले.जनसामान्यांशी संपर्क सर्व सामान्यांची कामे या बळावर त्यांनी आपल्या मतदार संघात एक छाप सोडली होती.2014 मध्ये विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही त्यांनी आपला दांडगा संपर्क कायम ठेवला होता.दोन टर्म आमदार असतानाही त्यांनी भाड्याच्याच घरात राहतात.गरीबांचा आमदार म्हणुन त्यांचा परीचय होता.

गेल्या आठ दिवसापासुन त्यांची तबियत अस्वस्थ होती.आमदार म्हणुन निवडून आल्यापासुन अगदी शेती- बांध्यावर,वाडी तांड्यावर प्रत्यक्ष जाऊन त्यांनी जनतेच्या समस्या जाणुन घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करीत होते.अशात त्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यामुळे एक हळव्या मनाचा आमदार आपल्यापासुन हिरावल्या गेल्याची भावना नागरीक व्यक्त करीत आहेत.आमदार अंतापूरकर त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मली,एक मुलगा,जावाई,नातु असा परीवार आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED