थैलसिमीया रुग्णांसाठी सांगली सिव्हीलमध्ये आता नियमित औषधे उपलब्ध होणार – युवराज मिरजकर

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.10एप्रिल):- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, वसंतदादा रुग्णालय सांगली व समवेदना मेडिकल फौंडेशन यांच्या पुढाकाराने थैलेसिमीया मुलांची हेळसांड कमी होणार आहे.थैलेसीमिया ग्रस्त रुग्णांना आवश्यक असलेली औषधे कायम स्वरूपी देणे गरजेचे असते. मात्र हि औषधे नियमित उपलब्ध होत नव्हती. विशेषतः सांगली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये आजतागायत अशी औषधे नियमितपणे उपलब्ध नसल्याने सर्व थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांची गैरसोय होत होती. कोविड साथी दरम्यान अशी औषधे उपलब्ध होणे अत्यंत अवघड होते.

तथापि समवेदना मेडीकल फाउंडेशन चे अध्यक्ष बरकत पन्हाळकर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे व मिरज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी समन्वय साधून डेसीरॉक्स, केल्फर ही औषधे तात्काळ उपलब्ध करून दिली आहेत.आज सांगली जिल्ह्यासह सीमा भागातील गरजू थैलसिमिया रुग्णांना या औषधांचे वाटप करण्यात आले. हि औषधे आता नियमित उपलब्ध असणार आहेत.त्यामुळे सांगली जिल्ह्यातील या मुलांच्या पालकांना औषधासाठी सातारा, कोल्हापूर येथे जावे लागणार नाही सांगली सिव्हीलमध्ये ही औषधे उपलब्ध होत असल्याने गरजूंनी घेऊन जावीत असे आवाहन अधिष्ठाता डॉ.सुधीर नणंदकर, सिव्हील सर्जन डॉ. संजय साळुंखे, डॉ.शिशिर मिरगुंडे व फौंडेशनचे अध्यक्ष बरकत पन्हाळकर यांनी केले आहे.

ही औषधे नियमित उपलब्ध व्हावीत यासाठी सांगली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकिशोर गायकवाड, , उप अधीक्षक डॉक्टर सतींश अष्टेकर, उप वैद्यकिय अधिक्षक डॉ.रूपेश शिंदे, औषध शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर श्रद्धा पोरे , नर्सिंग स्टाफ, पदव्युत्तर विद्यार्थी व फौंडेशनचे पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष रंजित पाटील, डॉ. विनायक मराळे, सद्याम ढालाईत, किशोर कांबळे, राजू कांबळे यांचे सहकार्य लाभले.या वेळी उपस्थित रुग्णांच्या पालकांनीही समाधान व्यक्त करून रुग्णालयामार्फत नियमितपणे औषध पुरवठा केला जावा अशी आशा व्यक्त केली

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED