गडचिरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह आज(10 एप्रिल) 269 नवीन कोरोना बाधित तर 72 कोरोनामुक्त

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.10एप्रिल):-आज जिल्हयात 269 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 72 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 12100 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10585 वर पोहचली. तसेच सद्या 1389 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 126 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज एका नवीन मृत्यूमध्ये धानोरा तालुक्यातील 67 वर्षीय पुरुषाचा निमोनियाने मृत्यू झाला आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.48 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 11.48 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला.

नवीन 269 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 124, अहेरी तालुक्यातील 12, आरमोरी 19, भामरागड तालुक्यातील 5, चामोर्शी तालुक्यातील 11, धानोरा तालुक्यातील 24, एटापल्ली तालुक्यातील 12, कोरची तालुक्यातील 8, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 29, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 2, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 5 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 38 तर आज कोरोनामुक्त झालेल्या 72 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 30, अहेरी 8, आरमोरी 3, भामरागड 3, चामोर्शी 4, धानोरा 7, एटापल्ली 4, सिरोंचा 1, कोरची 1, कुरखेडा 4, तसेच वडसा 7 येथील जणाचा समावेश आहे.

काल सायंकाळपर्यंत लसीकरणाचे तपशील – जिल्हयातील शासकीय 68 व खाजगी 2 अशा मिळून 70 बुथवर काल पहिला लसीकरणाचा डोज 1125 व दुसरा डोज 214 नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 44982 तर दुसरा डोज 10918 नागरिकांना देण्यात आला आहे.
****

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED