राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ब्रम्हपुरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.10एप्रिल):- सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातला आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विविध आजारांतील गंभीर रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. परंतु राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा होत नाही.

ही बाब गंभीर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने “रक्तदान शिबिराचे” आयोजण करण्याच्या आपल्या कार्यकर्त्यांना सुचना दिल्या.व जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.
त्या अनुषंगाने ब्रम्हपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ब्रम्हपुरी शहरातील ख्रिस्तानंद रुग्णालय रक्तपेढी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष मनोज वझाडे, रा.काँ. जिल्हा सचिव मनोज कराडे, तुळशीराम काटलाम, मंगेश भुते, राजेश तलमले, राकेश शेंडे, परीक्षित कामडी, गोलू मेश्राम, राजेश माटे, निखिल करंबे, अक्षय शेंडे, निखिल सहारे, चेतन दिवटे, अंकुश राखडे, उमेश गणवीर, महेश तलमले,भूषण मोहुर्ले,पिंटू सोंदरकर, प्रशांत तलमले, प्रफुल करंडे सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आपल्या सामाजिक दायित्वाचा परिचय दिला.

या प्रसंगी राजू पिलारे, जनता ठेंगरी, अमोल ठेंगरी, अतुल राऊत, सुधीर पिलारे , राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष जगदीश उर्फ मोंटू पिलारे, तालुका अध्यक्ष वासूभाऊ सोंदरकर यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबीर पार पडले.
कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करीत सदर रक्तदान शिबिर पार पडले.