कोरोना च्या पार्श्वभूमीवर वाढदिवस न करण्याचा निर्णय घेऊन सामाजिक कार्यकर्ते- गजानन चव्हाण नायगांवकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी

30

✒️शिवानंद पांचाळ(नायगाव प्रतिनिधी)मो:-9960748682

नायगाव(दि.11एप्रिल):-दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा वाढदिवस यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेऊन सक्रिय सामाजिक कार्यकर्ते- श्री गजानन शंकरराव चव्हाण यांनी वाढदिवस साजरा करायचा नाही हा निर्णय घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केले आहेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणीही भेटण्यासाठी यंदा येऊ नये अशी कळकळीची विनंती देखील त्यांनी केली होती सामाजिक कार्यकर्ते गजानन शंकरराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी नायगांव शहरात मोठ्या उत्साहात आनंदाने राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील तसेच मित्र परिवार, तसेच विविध स्तरावरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना भेटून आशिर्वाद सह त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत होते, देशासह राज्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे, या कोरोना महामारीच्या संकटात वाढदिवस साजरा करणार नाही, प्रत्येक भेटून शुभेच्छा नये,असे विनंती पुर्वक आव्हान ही केले होते, हा निर्णय घेऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी शासनाच्या नियमाचे तंतोतंत पालन करून साईबाबा मंदिर नायगांव या ठिकाणी अभिषेक महापूजा आरती करून सर्व जनतेच्या आरोग्यासाठी कोरोना बाधित असलेले रुग्ण लवकर बरे व्हावेत, सर्व मानवतेच आरोग्य चांगले राहावे सर्व बाबीने सुख समृद्धी मिळो सर्वांचे नंदनवन चांगले हावे जगावर, देशावर असलेलं कोरोना नावाचं संकट टळू दे अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी साकडे घालून करण्यात आली आहे, यावेळी साई महाराज, धनंजय पाटील चव्हाण उपस्थित होते असे आमच्या प्रतिनिधीशी गजानन शंकरराव चव्हाण नायगांवकर यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी पुढे बोलताना म्हणाले की माझ्यावर
प्रेम करणाऱ्या सर्व मित्र परिवारांना नम्रपणे आव्हान करण्यात येते की आपण आपल्या घरी राहून स्वतःची व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी आणि आपण फेसबुक व्हाट्सअप भ्रमणध्वनी विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून मला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद मिळाल्या त्याबद्दल मि आभारी आहे, सदैव जनसेवासाठी मि हजर राहीन तरी सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी व शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून या महामारी बिमारीला रोखण्यासाठी सर्वांनी संबंधित प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती चव्हाण यांनी केले आहेत,