जिवती तालुक्यात कडकडीत बंद मुळे चोहीकडे शुकशुकाट

25

🔸नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.11एप्रिल):-कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या विकेंड लाॅकडाऊनला जिवती तालुकावासियांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळत आहे.तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट आहे.शनीवार आणि रविवार या दोन दिवसांच्या लाॅकडाऊनला पहिल्याच दिवशी तालुकाभरात मोठया पैकी प्रतिसाद मिळाला आहे.फक्त मेडिकल आणि दवाखाने सोडून इतर किराणा माल, भाजी मार्केट, हाॅटेल्स, चाय टपरी, पान टपरी,कापड केंद्र,सर्वच दुकानांना टाळे लागले आहे. या लाॅकडाऊनमुळे वाहतुकीवरही परिणाम दिसून येत आहे.राज्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लावताना शनिवार आणि रविवार कडक लाॅकडाऊन घोषीत केला या दोन दिवसात आत्यवश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील असे जाहिर करण्यात आले.

राज्यात अनेक ठिकाणी लाॅकडाऊनला विरोध होत असतांना विकेंड लाॅकडाऊनला मात्र जिवती तालुक्यातील जनतेने आणि लहान ,मोठे व्यापाऱ्यांनी मनापासून स्विकारलेला दिसत आहे.नेहमीची वर्दळीची गजबजणारी ठिकाने शांत दिसत आहेत.हाॅटेल्स यांना पार्सल सेवा देण्यास मुभा असली तरी ती देखील बंद असल्याचे पहायला मिळाले आजच्या लाॅकडाऊनमुळे प्रवासी आणि अन्य वाहतूक देखील बंद असल्याचे जाणवले