पुसद येथे महात्मा फुले जयंती साजरी

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.11एप्रिल):-महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसद धम्मक्रातीं प्रज्ञापर्व समिती २०२१ यांच्या वतीने स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते थोर समाजसेवक महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती मोठ्या उस्तवात साजरी करण्यात आली.महात्मा ज्योतिबा फुले चौक मधील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार व दीपप्रज्वल करून वंदन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय अंध महासंघ मधील कलाकारांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित गीत सादर करण्यात आले.

यावेळी धम्मक्रातीं प्रज्ञापर्वचे अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, प्रसाद खंदारे,तेजस वाढवे,विशाल डाके,बिपीन हरणे, सद्धम जाधव,संजय इंगळे,समीर गवळी,दळवे सर,संजय चव्हाण,प्रवीण कठाले,अल्का कठाले,राजेंद्र रायपूर,नितीन वारकड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED