विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

69

✒️पालघर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पालघर(दि.11एप्रिल):- विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने दिनांक ९ एप्रिल २०२१ रोजी बोईसर येथील स्टार लाईट हॉस्पिटल मध्ये दलित पँथर व स्वराज्य बहुउद्देशिय सामाजिक संस्था संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करणार आले होते.देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव तसेच देशात व जिल्ह्यात प्रचंड निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता , आपला देश आपली जबाबदारी समजून दलित पँथर व स्वराज्य बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या संयुक्त वतीने तसेच महाराष्ट्र ब्लड बँक यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले.त्या सर्व रक्तदात्यांचे दलित पँथर व संस्थेच्या वतीने तसेच महाराष्ट्र ब्लड बँकच्या वतीने कोरोना योद्धा तसेच रक्तदाता म्हणून सर्व रक्तदात्यांना सन्मानाने गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पँथर अविश राऊत महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ,पँथर जगदीश राऊत पालघर जिल्हा अध्यक्ष , पँथर बिंबेश जाधव पालघर लोकसभा अध्यक्ष ,पँथर अरशद खान पालघर जिल्हा कार्याध्यक्ष , पँथर संतोष कांबळे पालघर जिल्हा महासचिव , पँथर भरत महाले पालघर जिल्हा कोषाध्यक्ष , पँथर चेतन जाधव व पँथर भावेश दिवेकर पालघर जिल्हा उपाध्यक्ष , पँथर मोहिनी जाधव पालघर जिल्हा महिला अध्यक्षा ,पँथर विद्या मोरे व पँथर भरती राऊत पालघर जिल्हा महिला उपाध्यक्षा , पँथर मरिना रिबेलो पालघर जिल्हा महिला सचिव , पँथर विनायक जाधव डहाणू तालुका अध्यक्ष तसेच डहाणू व तलासरी तालुका संपर्क प्रमुख , पँथर अफताब पठाण डहाणू तालुका कार्याध्यक्ष , पँथर दीपक जाधव डहाणू तालुका उपाध्यक्ष , पँथर उमेश कापसे पालघर तालुका कार्याध्यक्ष, पँथर अफसर खान व पँथर अहमद खान पालघर तालुका उपाध्यक्ष , पँथर सुचिता कांबळे पालघर तालुका महिला उपाध्यक्षा, पँथर सिद्धार्थ वाघमारे बोईसर शहर अध्यक्ष , पँथर जीभाऊ अहिरे वाणगाव शहर अध्यक्ष , पँथर सुधाम सर्जेराव सफाळे विभाग कार्यकारणि , पँथर प्रविन जाधव सफाळे विभाग कार्यकारणी , पँथर भरत पवार वाणगाव शहर सचिव ,पँथर भारत पवार वाणगाव शहर संघटक, पँथर सुरेद्र मोरे उसरणी शाखाध्यक्ष, पँथर राजेश सावंत या सर्व दलित पँथर तसेच स्वराज्य बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व महाराष्ट्र ब्लड बँकच्या तेजल पाटील व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले व रक्तदान शिबिर यशस्वी केले.