चैत्यभूमी म्हणजेच अस्मिता, कुठेही तडजोड नाही, बांधकाम पाडलेच पाहिजे – डेमोक्रॅटिक रिपाई

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.11एप्रिल):- चैत्यभूमी आमची अस्मिता असून अस्मिते आड कोणीही आले तर सहन केले जाणार नाही त्यामुळे बांधकाम हे पाडलेच पाहिजे अन्यथा डेमोक्रॅटिक आरपीआय मैदानात उतरेल असा गंभीर इशारा पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.

सत्तेचा माज चढवून आंबेडकर व बौद्ध अस्मितेसोबत खेळाल तर फुकट जातीय तेढ निर्माण करून देशाच्या एकता व अखंडतेला तडा देन्याचे पातक करू नका.

आमदार असो व खासदार या अजून कोणी आम्हाला काही फरक पडत नाही, आंबेडकर भवन झाले, राजगृह झाले, आता चैत्यभूमी(?) रिपब्लिकन आंबेडकरी जनता मुळीच सहन करणार नाही.

*चैत्यभूमी* सारख्या पवित्र वास्तूला जातीवादातून राजकारण करून सत्तेआड स्वार्थाची पोळी भाजू इच्छिणाऱ्या आमदारावर तर कायदेशीर कार्यवाही व्हावीच, मात्र; बांधकाम परवाना देणाऱ्या अधिकाऱ्याला निधी देणाऱ्या जिल्हाधिकार्याला व बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला ही कडक शासन होणे गरजेचे आहे.

न्यायलायचा आदेश असतांना महापालिका कर्मचारी बांधकाम पाडत असतांना दगडफेक करेल अशी चिथावणी देणाऱ्या आमदार सदा सरवणकर वर शासकीय कामात अडथळा व अट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई व्हावी.

धर्मशाळेचे बांधकाम त्वरित नाही पाडल्यास पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया टी.एम.कांबळे गट मैदानात उतरेल व जातीवादि प्रवृत्तीना ठेचुन काढेल, उमटणार्या सर्व पडसादाला शासन प्रशासन व आमदार सरवनकर जवाबदार असतील असा इशाराही डॉ. माकणीकर यांनी दिला.

महाराष्ट्र, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED