फुले समजून घेतांना

शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला ज्या भट ब्राम्हणांनी कट कारस्थान करून नष्ट केले व आपली सत्ता प्रस्थापित करत या साध्या भोळ्या जनतेला अज्ञानाच्या अंधकारात ठेवून चुकीच्या रूढी, प्रथा परंपरामध्ये गुंतवून ठेवले व नेहमीच धार्मिक, सामाजिक, आर्थिक शोषण व अन्याय अत्याचार करत होते अशा ह्या अन्यायी ब्राह्मणांची दुकानदारी बंद पाडणारे आधुनिक भारतातील खरे क्रांतिकारक म्हणजे

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सर्वसामान्य बहुजनांचे कुणबी, तेली, माळी, बौद्ध, मुस्लिम, हरिजन इत्यादी चे खरे कैवारी म्हणजे महात्मा फुले होते.परंतु आजची परिस्थिती पूर्णतः बदलली आहे शिवाजी म्हणजे मराठ्यांचे, तुकाराम म्हणजे कुणब्याचे, जगनाडे तेल्याचे, फुले माळ्यांचे, आंबेडकर बुद्धिष्ठांचे अशा प्रकारे आज आपण आपल्या महापुरुषांना धर्म आणि जातीमध्ये बांधुन ठेवलेला आहे,आज आपल्याला जर खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर सर्वात आधी या सर्व महमानवांना जात आणि धर्म चौकटीच्या बाहेर काढावे लागेल तेव्हाच आपल्याला फुले शाहू आंबेडकर समजतील. या महापुरुषांनी कधीही आपल्या उभ्या आयुष्यात जातीभेद मानला नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंबेडकरांनी फुलेंना, फुलेंनी शिवरायांना, शिवरायांनी तुकारामांना गुरू मानले व त्यांना गुरुस्थानी ठेऊन सदा सर्वदा कार्य केले, म्हणूनच ते आज आपल्या समोर एक वेगळा व्यक्तिमत्त्व म्हणून उभे राहू शकले.

महात्मा फुले हे खरे मानवतावादी होते त्यांनी कधीही कोणत्या धर्माचा किंवा जातीचा विरोध केला नाही, त्यांनी विरोध केला तो त्या धर्मातील चुकीच्या रूढी, प्रथा, परंपरा, कुप्रथाचा. महात्मा फुले नेहमी म्हणायचे…..
“कल्पनेचे देव कोरिले उदंडासाठी।”

म्हणजेच या ब्राम्हणांनी आपला पोट भरण्यासाठी कल्पनेतून देव निर्माण केला आहे, परंतु हे अंतिम सत्य आमच्या ह्या बहुजन समाजाला अजूनही कळले नाही, त्यात दोष त्यांचा नाही कारण कोणत्याही समाजाच्या अधोगतीचे कारण म्हणजे समाजातील अज्ञान होय हे फुलेंनी ओळखले म्हणूनच त्यांनी इ.स.१८४८मध्ये पुणे येथे पहिली शाळा काढली व

।। “विद्येविना मती गेली,
मतिविना नीती गेली
नीतिविना गती गेली
गतिविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्यने केले “।।

हा शिक्षणाचा महामंत्र देत खऱ्या अर्थाने त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. फुले इतक्यावरच थांबले नाहीत त्यांचे सामाजिक क्षेत्रात देखील खूप मोठे योगदान होते त्यांना समाजातील अंधश्रद्धा दूर करायची होती म्हणून त्यांनी ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली व त्यामाध्यमातून नेहमी सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सतीप्रथा, बालविवाह, बालब्रूनहत्या अशा सर्व कुप्रथाना विरोध केला, व विधवा पुनर्विवाह सारख्या चांगल्या गोष्टीला समर्थन देखील दिले.आज आपल्या पैकी बऱ्याच लोकांना कदाचित माहीती नसेल की फुले हे समाजसुधारकाबरोबरच एक चांगले शेतकरी व एक चांगले उद्योगपती सुद्धा होते त्यांची “The Puna Commercial Contracting Construction’ नावाची एक कम्पनी होती त्या माध्यमातून त्यांनी खडकवासला धरण,कात्रज चा बोगदा, मुळा मुठा नदीवरील पूल यासारखे असंख्य मजबूत आणि भारी भक्कम बांधकाम केले आहे ते आजच्याही परिस्थिती जशास तसे आपल्याला दिसून येतात आजच्या उद्योगपतींनी देखील त्यांच्या कडून आदर्श घेऊन काम करण्याची गरज आहे.

फुलेंना चांगली लेखन कला देखील अवगत होती त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, ब्राम्हणांचा कसब, दुःखी अंग यासारख्या असंख्य ग्रंथ व काव्यांची देखील रचना केली व त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन घडवून आणला, आज परत फुले समजून घेताना अश्याच विविध पैलुनी आपल्याला फुले अभ्यासावे लागतील व आपल्यातील अंधश्रध्दा दूर करावी लागेल. हीच खरी आदरांजली आज आपण आपल्या महामानवांना देऊ शकूत असे मला वाटते.

✒️लेखन- अनुप व्ही.कोहळे
मु.राजनगट्टा ता.चामोर्शी जिल्हा- गडचिरोली.
मो. 9923815724

गडचिरोली, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED