द बेस्ट डिजिटल किंग अवार्ड ने सन्मानित मनोज माळी

🔹सलग चौथ्यांदा राज्यस्तरीय राज्य पुरस्कार प्राप्त….

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगांव(दि.11एप्रिल):- धरणगाव शहरातील मोठा माळीवाडा परिसरातील रहिवासी मनोज अशोक माळी कृषी क्षेत्रातील नामवंत कंपनी कोरटेवा ॲग्री ग्रसायन्स मध्ये मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत.शेतकऱ्यांना वेळोवेळी पिकाची माहिती आणि मार्गदर्शन धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मनोज माळी साहेब हे करत असतात. नोकरी करत असताना गोदावरी इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट रिसर्च येथे
बाहेरून शिक्षण एम.बी.ए करीत आहेत.

प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार मार्केट डेवलपमेंट इफेक्टिवेनेस 2017हा पुरस्कार इगतपुरी नाशिक येथे देण्यात आला होता.
द्वितीय राज्यस्तरीय पुरस्कार डिमांड जनरेशन अवार्ड 2018 इंटरनॅशनल हॉटेल नागपूर येथे देण्यात आला.तृतीय राज्यस्तरीय पुरस्कार द अ‌चीवर 2019 रामोजी सिटी हैदराबाद येथे नेशनल लीडर श्री. रेड्डी साहेब व विवेक शर्मा साहेब यांच्या हस्ते देण्यात आला.आता 2021 मध्ये सलग चौथ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार द बेस्ट डिजिटल किंग अवार्ड 2020 झूम मीटिंग द्वारे बहूमान मिळाला. सावित्रीबाई फुले चौक व मोठा माळीवाडा परिसर यातील सर्व नागरिक व धरणगाव वासियांनी अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केला.

कंपनीचे अधिकारीएरिया सेल्स मॅनेजर केतन गर्ग,पवन साबळे, जिल्हा मार्केटिंग मॅनेजररामधन परदेशी, संजय सोनवणे, महेंद्र पाटील यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल आणी कृषी विक्रेते, शेतकरी बंधू यांचे नेहमी सहकार्याबद्दल ऋणी राहील असे प्रतिपादन मोठा माळीवाडा परिसरातील सलग चौथ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मनोज अशोक माळी यांनी केले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED