“महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र” च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी मनोज माळी यांची नियुक्ती

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.11एप्रिल):-महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र” च्या जळगाव जिल्हाध्यक्ष ( युवक अघाडी )पदी मनोज अशोक माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महात्मा फुले ब्रिगेडच्या माध्यमातून माळी समाजाला एक नवीन दिशा प्रदान कराल व महात्मा फुले ब्रिगेडच्यावतीने राबवल्या जाणार्‍या सामाजिक कार्यासाठी नेहमी अग्रेसर राहाल ही अपेक्षा !. तसेच भारतातील थोर समाजसुधारक – स्त्री शिक्षणाचे जनक – क्रांतिससूर्य – राष्ट्रपिता – तात्यासाहेब – महात्मा जोतीराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांचा खरा इतिहास तसेच महात्मा फुले ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून “माळी” समाजासाठी वेळोवेळी राबवले जाणारे विविध स्वरुपाचे समाज हिताचे काम माळी समाजातील जन- सामान्यांपर्यंत पोहचवाल, या अपेक्षेसह व महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्रच्यावतीने मनोज अशोक माळी यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्रचे धरणगाव तालुका अध्यक्ष नरेंद्र साहेबराव महाजन, जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष सचिन रघुनाथ माळी, जळगाव जिल्हा अध्यक्ष भिकन पुंडलिक महाजन, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख प्रज्योत दशरथ फुलसुंदर, प्रदेश संपर्कप्रमुख धनराज एस देवरे, प्रदेश सरचिटणीस उत्तम जी. गोरे, प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय किसनराव चांबारगे (माळी), प्रदेश उपाध्यक्ष पन्नालाल टाक, प्रदेश उपाध्यक्ष रमेश सोनवणे, पुणे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवदास महाजन आदींनी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED