चंद्रपूर जिल्ह्यात (दि.11एप्रिल) रोजी 24 तासात 305 कोरोनामुक्त 937 कोरोना पॉझिटिव्ह – 11 कोरोना बधितांचा मृत्यू

41

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.1 एप्रिल):-जिल्ह्यात मागील 24 तासात 305 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 937 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 11 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 33 हजार 529 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 27 हजार 759 झाली आहे. सध्या 5278 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 2 हजार 608 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 63 हजार 228 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये सिंदेवाही येथील 67 वर्षीय पुरुष, चंद्रपूर शहराच्या ऊर्जानगर येथील 45 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 43 वर्षीय पुरुष व रामनगर येथील 63 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील 29 वर्षीय पुरुष, बावणे लेआऊट वरोरा येथील 51 वर्षीय पुरुष, शेगाव ता. वरोरा येथील 50 वर्षीय पुरुष, घुग्गुस येथील 50 वर्षीय पुरुष, गौराळा ता. भद्रावती येथील 55 वर्षीय महिला, ख्रिस्तानंद चौक, भद्रावती येथील 42 वर्षे पुरुष, संताजी नगर भद्रावती येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 492 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 448, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 937 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 241, चंद्रपूर तालुका 45, बल्लारपूर 47, भद्रावती 22, ब्रम्हपुरी 56, नागभिड 32, सिंदेवाही 24, मूल नऊ, सावली 47, गोंडपिपरी सहा, राजूरा 37, चिमूर 73, वरोरा 228, कोरपना 50, जीवती सात व इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺 जिल्ह्यात सहा मृत्यूसह आज 296 नवीन कोरोना बाधित तर 102 कोरोनामुक्त

गडचिरोली(दि.11एप्रिल):-आज जिल्हयात 296 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 102 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 12396 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10687 वर पोहचली. तसेच सद्या 1576 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 133 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज सहा नवीन मृत्यूमध्ये आरमोरी तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये ता.ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील तीन पुरुषाचा समावेश असून एकाचे वय 62 वर्ष, दुसऱ्या व्यक्तिचे वय 37 वर्ष व तिसऱ्या व्यक्तिचे वय 54 वर्ष होते. व चंद्रपूर जिल्ह्यातीलच चिमुर येथील 54 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच गडचिरोली तालुक्यातील मानसिक आजाराने ग्रस्त 6 वर्षीय बालकाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.21 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 12.71 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.

नवीन 296 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 114, अहेरी तालुक्यातील 41, आरमोरी 19, भामरागड तालुक्यातील 12, चामोर्शी तालुक्यातील 18, धानोरा तालुक्यातील 15, एटापल्ली तालुक्यातील 6, कोरची तालुक्यातील 28, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 15, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 7, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 3 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 18 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 102 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 54, अहेरी 11, आरमोरी 11, भामरागड 7, चामोर्शी 6, धानोरा 4, मुलचेरा 2, कुरखेडा 2, तसेच वडसा 5 येथील जणाचा समावेश आहे.काल सायंकाळपर्यंत लसीकरणाचे तपशील – जिल्हयातील शासकीय 68 व खाजगी 2 अशा मिळून 70 बुथवर काल पहिला लसीकरणाचा डोज 2010 व दुसरा डोज 185 नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 46992 तर दुसरा डोज 11103 नागरिकांना देण्यात आला आहे.