राजनगट्टा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.12एप्रिल):-नेहरू युवा केंद्र, गडचिरोली अंतर्गत छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टा च्या वतीने राजनगट्टा येथे कोविड नियमांचे पालन करत महात्मा फुले जयंती समारोह चे आयोजन करून महात्मा फुलेंना अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री अरुण मडावी सरपंच ग्रा.वालसरा तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.कविता कोहळे स. ग्रा.वालसरा, सौ.ज्योती शेट्टीवार स.ग्रा.वालसरा,श्री अतुल बुरांडे, श्री वसंत कोहळे आदी मान्यवर व गावातील युवक गावकरी उपस्थित होते. यावेळी गावातील चिमुकल्यानी गीत सादर करून आपल्या कलाकृतीचे प्रदर्शन देखील केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप कोहळे तर आभार सुषमा पेंदाम यांनी मानले.

गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED