आंतरधर्मीय विवाह सोहळ्याच्या माध्यमातून जाधव- मस्के परिवाराने केली जातीअंताच्या लढाईला सुरुवात

27

🔸परिवर्तनवादी मंगल परिणय जाधव -मस्के परिवाराचे क्रांतीकारी पाऊल- अॅड.प्रकाश आंबेडकर

✒️नवनाथ पौळ(बीड,अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.12एप्रिल):-आपण अनेक मंगल परिणय (विवाह) किंवा लग्न समारंभ हे दोन्ही कडील पाहुण्यांची बैठक, घेऊन सुपारी फोडून, कुंकू साक्षगंध, घेऊन ठरलेले बघतो व अशाच पद्धतीने आपल्याकडे लग्न करण्याची परंपरा आहे किंवा प्रेम विवाह होतात. परंतु हे लग्न थोडया वेगळ्या पद्धतीने आहे…. हे उचलले पाऊल सामाजिक, वैचारिक क्रांती कडे वाटचाल करणारे आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडी बीड चे लोकसभेचे उमेदवार प्रा. विष्णू तुळशीराम जाधव यांनी हा सगळा योग घडऊन आणला आहे. त्यांची एकुलती एक मुलगी कुमारी स्वाती ही एक बी.ई. सिविल इंजिनीयर आहे तर मुलगा चिरंजीव हर्षद मस्के राहणार केज हा बी ई. मेकॅनिक आहे व ते बाळासाहेब श्रीपती मस्के यांचे द्वितीय चिरंजीव आहे. या विवाह सोहळ्याचे वेगळेपण म्हणजे हे लग्न थोडं वेगळ व ऐतिहासिक पार्श्वभूमी निर्माण करणारे आहे.

आपल्याकडे जाती -जाती मध्ये आप्तस्वकीय मध्ये अनेक मंगल परिणय/ विवाह होताना पाहिले आहेत किंवा होताहेत.
डॉ.बाबासाहेबांच्या एकूण विचार सरणीचा भाग म्हणजे जातीअंताचा लढा. तो लढण्याचे बीड जिल्ह्यातील एक पहिले पाऊल ठरेल असा हा ऐतिहासिक मंगल परिणय दिनांक 9 एप्रिल रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील काही अंतरावर संपन्न झाला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर, डॉ. अंजली ताई आंबेडकर आहे.
आजची ही वधू जातीने कैकाडी या भटक्या समूहातील आहे तर मुलगा बौद्ध समूहातील आहे . हा मंगल परिणय वैचारिक पातळीवरुन बैठक घेऊन ठरवलेला आहे. म्हणजे ही परिवर्तनाची व सामाजिक क्रांतीची सुरुवात आहे असे म्हणायला हरकत नाही..

देशांत थोर समाज सुधारक व महापुरुषांनी जातीअंताचे अनेक लढे लढून खूप चांगल्या पद्धतीने सामाजीक सुधारणासाठी काम केलेले आहे. त्या पथावर चालणारे अनेक जन आहेत. परंतु महामानवाचे विचार पुस्तकात वाचण्यात- ऐकण्यात बरे वाटतात. पण प्रत्यक्ष कृती करायला लोक पुढेधजावत नाहीत. परंतु विचाराला कृतीची जोड देणारे बोटावर मोजण्याइतकेच असतात . त्यापैकीच प्रा. विष्णू जाधव वधूपिता तर बाळासाहेब मस्के वर पिता या दोन परिवारांनी एक क्रांतीचे पाऊलपुढे टाकत जातिअंताच्या लढाईची सुरुवात केली आहे.

या मंगल परिणय सोहळ्याला खासकरून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर व अंजलीताई, माजी मंत्री सुरेश नवले, माजी आमदार राजेंद्र जगताप, आरपीआयचे अध्यक्ष पप्पू कागदे,किसन चव्हाण, फारूक अहमद अशोक हिंगे, डॉ नितीन सोनवणे, अरुण जाधव,धर्मराज चव्हाण, प्रा सुरेश शेळके, सतीश सोनवणे, विष्णू शेळके, भालशंकर, भोजने, संदीप उपरे, योगेश बन, प्रभाकर बकले, कपिल मस्के, संतोष जोगदंड धम्मानंद साळवे, भगवंत वायबसे ,युवक नेते गोटू वीर, युनूसभाई शेख, ज्ञानेश्वर कवठेकर, बबन वडमारे, पुष्पाताई तुरुकूमारे, अजय सरवदे, अजय भांगे,लखन जोगदंड पप्पू गायकवाड गणेश खमाडे, किरण वाघमारे, किशोर भोले, बंटी सौंदर मल, विश्वजीत डोंगरे, सुमित उजगरे, आदीसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते उपस्थित होते.

लॉकडाऊन काळ असल्यामुळे मोजकेच मान्यवरांना या लग्नसमारंभा साठी निमंत्रित केले आहे .शासनाच्या सर्व नियमांचे अटींचे,पालन करून हा मंगल परिणय सोहळा आज होत आहे. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा “परिवर्तनिय ” मंगल परिणय सोहळा प्रथमच आपल्या बीड जिल्ह्यातील गेवराई या ठिकाणी पार पडला.विचारांचे वारस तर अनेक आहेत पण कृतिशील वारस खूप कमी आहेत हे या मंगल परिणय कार्यातून दिसून येत आहे. म्हणून जातिअंताच्या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या दोन्ही कुटुंबांना व त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरून हार्दिक शुभेच्छा मान्यवरांच्या वतीने देण्यात आल्या आहेत.