तात्यासाहेबांची जयंती घरातच उत्साहात साजरी….

30

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगांव(दि.12एप्रिल):- धरणगाव येथील सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल येथील उपक्रमशील शिक्षक पी. डी. पाटील यांनी आपल्या गावी मांदुर्णे ता. चाळीसगांव येथे भारतातील थोर समाजसुधारक, सत्यशोधक, राष्ट्रपिता, तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांची जयंती घरातच राहून परिवारासमवेत साजरी केली.सर्वप्रथम आई – वडील यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या मुर्तीचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. घरातील सर्व सदस्यांना व बालगोपालांना महामानवांचे ग्रंथ भेट देण्यात आले.

महामानवांची जयंती नाचून नव्हे तर ग्रंथ वाचुन साजरी करावी असा संदेश कुटुंबाच्या वतीने देण्यात आला.
याप्रसंगी पी. डी. पाटील यांनी सर्व कुटुंबाला राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचे जीवनकार्य सांगितले. विचार हे घरापासून दिले पाहिजे लहान मुलांना आतापासूनच महापुरुषांचा खरा इतिहास सांगणे गरजेचे आहे. याप्रसंगी बालगोपालांना लहान – लहान ग्रंथ भेट स्वरूप देण्यात आले.

तात्यासाहेबांचे जीवन कार्य उलगडतांना एक उद्योगपती, लेखक, विचारवंत, स्त्री शिक्षणाचे आद्य जनक, शिवशाहीर, शिक्षणतज्ञ, कृषीतज्ञ, अर्थतज्ञ, आदर्श शिक्षक, शिवजयंतीचे जनक, आदर्श पती, समाजसेवक अशा विविध पैलूंवर परिवारातील सदस्यांना तात्यासाहेबांचे कार्य विशद केले. महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले आहे म्हणून महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम बाहेर किंवा समूहात घेऊ शकत नाही. सगळ्यांनी शासनाचे नियम पाळत घरातच महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करावेत व महापुरुषांचे विचार आत्मसात करावे असे प्रतिपादन पी. डी. पाटील यांनी केले.