फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त दहिवडीत रक्तदान शिबिर

39

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.12एप्रिल):-राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त 14 एप्रिल 2019 रोजी दहिवडी, तालुका माण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आंबेडकर चौक येथे संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे असे जयंती महोत्सवाचे अध्यक्ष यांनी सांगितले.

सध्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे त्यामुळे यंदाचा जयंती महोत्सव विधायक पद्धतीने साजरा करत महाराष्ट्र अडचणीत असताना आम्ही आमचं रक्त देशाला आणि राज्याला देऊन या दोन्ही महामानवांना अभिवादन करणार आहे यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे असे महोत्सव समितीच्या सदस्यांनी सांगितले.दहिवडी नगरपंचायतीच्या नगरसेविका अर्चना खरात यांनी दहिवडी करांना जाहीर आवाहन केले आहे की आपण या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवून या महामानवांना अभिवादन करावे.

रक्तदान शिबिर हे कोरणा च्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार होणार असून सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर आणि मास्क, यावेळी असणे गरजेचे आहे.
रक्तदान करण्यासाठी नाव नोंदणी विजय खरात 9404630398, राकेश खरात 9049856299, सागर रणपिसे 7385591437, अजय खरात 7875243668, महेश खरात 9834464351 नाव नोंदणी त्यांच्याकडे करावे असे फुले -आंबेडकर जयंती महोत्सवाचे अध्यक्ष यांनी आवाहन केले आहे.