फोटो स्टुडिओंचा समावेश अत्यावश्यक सेवेत करा !

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.12एप्रिल):-कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून आस्थापने बंद ठेवण्याबाबत सुधारित प्रतिबंधात्मक आदेश जाहीर करण्यात आले आहेत ज्यामध्ये विविध शासकीय कार्यालये, विमा, मेडिक्लेम कंपन्या, सहकारी पीएसयू,आणि खाजगी बँका याशिवाय इतर वित्तीय सेवेशी निगडित असलेली सर्व शासकीय कंपन्या / कार्यालयांना मात्र या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे पण या सर्व कार्यलयांशी निगडित विविध कामांसाठी गरज भासणाऱ्या ID / पासपोर्ट फोटोसाठी आवश्यक असणाऱ्या फोटो स्टुडिओना मात्र या निर्बंधामधून कोणतेही सूट देण्यात आलेली नाहीये ज्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे..

यासाठी फोटो स्टुडिओ व्यावसायिकांचा समावेश हा अत्यावश्यक सेवेत करण्यात यावा व उपरोक्त कालावधीत फोटो स्टुडिओंना निर्बंधातुन सूट देण्यात येऊन ते निदान दिवसतुन काही काळ चालू ठेवणेस परवानगी देण्यात यावी यासाठीचे निवेदन आज फोटोग्राफिक वेल्फेअर असोसिएशन ऑफ सातारा यांच्या वतीने आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजेभोसले तसेच सातारा जिल्हा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पालकमंत्री व जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले.. .

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED