मरखेल पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटलांची महत्वपूर्ण बैठक

32

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

मरखेल(दि.12एप्रिल):-कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन जिल्हा अधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार मरखेल पोलिस स्टेशन येथे आदित्य लोणीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व गावपातळीवर स्थानिक प्रशासनाना सोबत राहून, सरपंच, ग्राम सेवक, पोलिस पाटील,व ग्रामपंचायत सदस्य एकत्र येऊन सर्व जनतेला कोरोना ‌महामारी विषयावर चर्चा करून त्यांना ह्या कोरोनाच्या अटी नियम पाळावे.

उदा. मास्कचा वापर करणे व मास्क चा वापर न करणाऱ्यांना दंड लावणे, अंतर ठेवून बोलणे, चालणे, सॕनेटायझरचा‌ वापर करणे, गावातील दुकानावर व चावडीवर गर्दी होऊ न देणे,नियम मोडणाऱ्या व्यक्ती व दुकानांवर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायत कार्यालयाकडून करून घेणे या विषयी चर्चा करण्यात आली. या महिन्यात येणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती, महावीर जयंती, या सर्व महापुरुषांच्या जयंत्या घरच्या घरी साजऱ्या कराव्यात कोणीही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणार नाही, किंवा मिरवणूक काढणार नाही, याबाबत गावात जनजागृती करणे.तसेच आगामी पवित्र रमजान महिण्यात मुस्लिम बांधवांनी घरीच राहून नमाज पठण करणे, मस्जित मध्ये फक्त मौलवी नमाज पठण करतील.

तसेच राम नवमी नंतर हनुमान जयंती 7 दिवसांनंतर असते या सात दिवसात मंदिरावर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते ते होऊ न देता यावर्षी घरच्या घरी सर्वांनी राम नवमी व हनुमान जयंती घरीच राहून साजरी करण्याबाबत गावात जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाच्या संदर्भात शासनाने तसेच मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी घालून दिलेल्या नियमाचे तंतोतंत पालन करावे असे या बैठकीमध्ये आदित्य लोणीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अदित्य लोणीकर यांनी सर्वांना सांगितले. तसेच हे सर्व करत असताना सर्व पोलीस पाटील यांनी स्वतःच्या आरोग्याची व त्यांचे कुटुंबीय यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले आहे. यावेळी हनेगाव,मरखेल, हाळी, लोणी,तुबरपळ्ळी,कोकलगाव, येडूर,‌ कुन्मारपली,‌ आदि‌ गावाचे पोलिस पाटील उपस्थित होते.