जुने भदाने येथील प्रा.योगेश सजन मासुळे यांचे सेट परीक्षेत यश

26

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

धुळे(दि.13एप्रिल):-तालुक्यातील जुने भदाणे येथील प्रा.योगेश सजन मासुळे हे सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.नुकतेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांनी दि. २७ डिसेंबर २०२० रोजी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या *State Eligibility Test (SET)* परीक्षेत जुने भदाणे येथील प्रा. योगेश सजन मासुळे हे भूगोल विषयातून सेट परिक्षा उत्तीर्ण झाले.

अत्यंत कठीण परिस्थतीतून त्यांनी हे यश संपादन केल्याने भदाने गावात तसेच पंचकृषित त्यांचावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच मित्र परिवाराने त्यांचा मोठ्या उत्साहाने सत्कार करण्यात आला या वेळी गावातील सुरजभाऊ महानर,तुषार खैरनार,दिनेश महानर,भाऊसाहेब महाले,रवींद्र मासुळे, गौतम वाघ,योगेश महाराज विनोद महानर,आकाश मोरे,देवा जाधव व गावातील ग्रामस्थांन तरुणांन कडुन कौतुक करण्यात आले.