शिक्षणतज्ञ गुरू – शिष्यांची जयंतीनिमित्त महापुरुषांचे ग्रंथ भेट

54

🔹महात्मा फुले ब्रिगेड धरणगाव यांचा अनोखा उपक्रम

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगांव(दि.13एप्रिल):- भारतातील थोर समाजसुधारक शिक्षणतज्ञ क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महात्मा फुले ब्रिगेड, धरणगाव यांच्या वतीने महापुरुषांचे ग्रंथ शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.सर्वप्रथम सावता माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष विठोबादादा महाजन व सचिव दशरथ महाजन, व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

माळी समाजाचे अध्यक्ष विठोबादादा महाजन, सचिव दशरथ महाजन व मान्यवरांच्या शुभहस्ते मोठा माळीवाडा परिसरातील विद्यार्थ्यांना महापुरुषांचे जीवन ग्रंथ वाटप करण्यात आले.
जांजीबुवा चौक मधील विद्यार्थ्यांना माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी सर महात्मा फुले ब्रिगेड चे अध्यक्ष नरेंद्र महाजन, आघाडी जिल्हाध्यक्ष मनोज महाजन यांच्या शुभहस्ते ग्रंथ वाटप करण्यात आले.याप्रसंगी फुलहार गल्ली परीसरात जेष्ठ नागरिक हरी महाजन , बहुजन क्रांती मोर्चा चे संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, महात्मा फुले ब्रिगेडचे सचिव नितेश महाजन, कार्यकर्ते विशाल महाजन, प्रदिप माळी,कांतीलाल महाजन, कैलास महाजन, सुनिल वाघ, आमोल महाजन यांच्या शुभहस्ते महापुरुषांच्या जीवन ग्रंथ भेट देण्यात आले.

यानंतर संजयनगर मधील सावता माळी चौक येथे विद्यार्थ्यांना महात्मा फुले ब्रिगेड चे अध्यक्ष नरेंद्र महाजन, मनोज महाजन यांच्या शुभहस्ते महापुरूषांचे ग्रंथ वाटप करण्यात आले.महापुरुषांच्या विचारांचा विद्यार्थ्यावर प्रभाव पडावा आणि भविष्यात त्यांनी उज्वल असे समाज कार्य आणि उज्वल भवितव्य घडावे या दृष्टीने महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र यांच्याकडून ग्रंथ वाटप करण्यात आले.धरणगाव परिसरातील विद्यार्थ्यांना ग्रंथ वाटप करून महापुरुषांना खऱ्या अर्थाने आदरांजली देण्यात आली. महापुरुषांचे विचार जपण्याचे आंबे कार्य करीत आहोत असे प्रतिपादन महात्मा फुले ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष नरेंद्र ( राजु ) महाजन यांनी केले.