क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी न करणाऱ्यावर कारवाई करा

29

🔸वंचित बहुजन युवक आघाडीने तहसिलदारा कडे निवेदनाद्वारे केली मागणी

✒️नवनाथ पौळ(बीड,अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.13एप्रिल):– महापुरुषाच्यां जयंती प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयात साजर्या कराव्यात असा शासनाचा आदेश असताना देखील केज मधील कांही कार्यालयात या आदेशाला केराची टोपली दाखवत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी न केल्याचे वंचित बहुजन युवक आघाडी चे कार्यकर्ते निलेश साखरे यांच्या लक्षात येताच तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले . मुजरा अधिकारी कर्मचाऱ्यांवर योग्य ते गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते , महात्मा ज्योतीबा फुले यांची ११ एप्रिल रोजी जयंती होती परंतु केज मधील सार्वजनिक बांधकाम उपविभाग केज , लघु पाटबंधारे विभाग केज , तालुका कृषी अधिकारी केज , गट साधन केंद्र केज , उपविभागीय जलसंधारण अधिकारी केज , जलसिंचन शाखा केज या कार्यालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली नसल्याचे निदर्शनास येताच वंचित बहुजन युवक आघाडी च्या वतीने केज तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

सदरील निवेदनावर प्रत्येक कार्यालयाचा पंचनामा करून दोषी कर्मचार्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरुपाचे धरणे अदोलंन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला निवेदनावर वंचित बहुजन युवक आघाडीचे नेते निलेश साखरे, अमोल चव्हाण, विजय अंडिल , अमीत भगत , विजय वनवे यांच्या सह आंदिच्या सह्या आहेत.