कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने रेमडीसिविर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा करण्याची रयत सेनेची मागणी

✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

चाळीसगाव(दि.13एप्रिल):-जील्ह्यसह तालुक्यात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणावर आहेत महात्मा फुले ट्रामा केअर सेंटर मध्ये रुग्णांची संख्या वाढली असून खासगी रुग्णालयात देखील बेड उपलब्ध होत नाहीत. आजमितीला चाळीसगाव मध्ये नऊ कोवीड केअर सेंटर हॉस्पिटल असून त्यात मोठ्या प्रमाणात कोरणा रुग्ण दाखल होत आहे. कोरोनाचा तीव्र उद्रेक असताना शासन दरबारी देखील सर्व हॉस्पिटल चालकांनी रेमडीसिविर इंजेक्शन मिळावे, म्हणून पाठपुरावा केला. असतानाही रेमडीसिविरचा पुरवठा होत नसल्याने हॉस्पिटल चालक देखील मोठ्या समस्येने ग्रासले आहे.

कोवीड केअर सेंटरला रेमडीसिविर इंजेक्शन चा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात जिल्हाधिकारी किंवा औषध निरीक्षकांकडून रेमडीसिविरचा पुरवठा होत नसल्याने कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने जिल्ह्यासह चाळीसगाव तालुक्यात रेमडीसिविर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा करण्याची जिल्हाधिकार्यांकडे तहसिलदार द्वारा निवेदनाद्वारे रयत सेनेने मागणी केली आहे.

रेमडीसिविर इंजेक्शनची साठेबाजी करून चढ्या भावाने रेमडीसिविर इंजेक्शन विक्री होत असल्याचे चित्र आहे. साठेबाजी करून रेमडीसिविर इंजेक्शन विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई का करण्यात येत नाही. कोवीड केअर सेंटर हॉस्पिटल चालकाने औषध निरीक्षक किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर तीनशे ते साडेतीनशे रेमडीसिविर चाळीसगाव येथे पुरवठा केल्या जात असल्याचे सांगण्यात येते मात्र प्रत्यक्षात प्रत्येक हॉस्पिटल मध्ये रेमडीसिविर कमी पुरावठा केल्या जात आहे. मग राहिलेले रेमडीसिविर जाते कुठे.संबंधित अधिकारी जर रेमडीसिविरचा पुरवठा सुरळीत होत असल्याचा दावा करत असेल तर कोरणा रुग्णांना वेळेवर रेमडीसिविर का मिळत नाही.कोरणा रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडीसिविर मिळावे म्हणून मेडिकलच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे .मात्र कुठेच रेमडीसिविर मिळत नसल्याने कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. जळगाव जिल्हाधिकारी व औषध निरीक्षकांचे प्रत्यक्ष जबादारी असताना मात्र जिल्ह्यात रेमडीसिविर वेळेवर मिळत नसल्याने कोरणा रुग्णांच्या नातेवाईकांनामध्ये त्यांच्या विरोधात तीव्र नाराजी आहे.

जळगाव जिल्ह्यात इंजेक्शनचा प्रचंड प्रमाणात साठेबाजी करून चढ्या भावाने रेमडीसिविर विक्री होत आहे. काळाबाजारात रेमडीसिविर विक्री करणाऱ्याना शासनाने शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. चाळीसगाव सह जळगाव जिल्ह्यात सुरळीत रेमडीसिविर चा पुरवठा न झाल्यास रयत सेना जिल्हाभर तीव्र आंदोलन करेल या प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास जिल्हाधिकारी जळगाव व औषध निरीक्षक जबाबदार राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना द्वारा तहसिलदार यांच्या मार्फत रयत सेनेने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,जिल्हाध्यक्ष संजय कापसे ,विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, शहराध्यक्ष सचिन नागमोती, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, छोटू अहिरे ,दीपक देशमुखसंतोष मोरे,गोकुळ चव्हाण,अरुण सैंदाणे,अविनाश कोल्हे, यांच्यासह रयत सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

 

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED