झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर (ग्रामीण) ची जिल्हा कार्यकारणीची गठीत

35

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.13एप्रिल):-पूर्व विदर्भातील झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील साहित्यिक मंडळींना बोलीभाषेचे ज्ञान व्हावे व या भागातील बोलली जाणारी बोलीभाषा तिचे संवर्धन व्हावे. या दृष्टिकोनातून झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी आभासी प्रणालीद्वारे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण शाखेची कार्यकारिणी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर केंद्रीय सदस्य झाडीबोली साहित्य मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली.

यामध्ये गोंडपिपरी येथील सुप्रसिद्ध कवी अरुण झगडकर यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष राजेंद्र घोटकर घुग्गुस ,सुरेश डांगे चिमूर, नेताजी सोयाम सिंदेवाही , सचिव रामकृष्ण चनकापुरे वढोली, सहसचिव संतोषकुमार उईके निलसनी पेटगाव, विरेनकुमार खोब्रागडे राजुरा, पंडीत लोंढे वरोरा तर संघटक म्हणून प्रशांत भंडारे आमडी,सुनील पोटे राजुरा,सुधाकर कन्नाके पोंभुर्णा,सुखदेव चौथाले मुल,संभाशीव गावंडे कोरपना,सुनील बावणे बल्लारपूर,लक्ष्मण खोब्रागडे मुल,अरूण घोरपडे भद्रावती,परमानंद जेंगठे मुल,संतोष मेश्राम नेरी यांची निवड केंद्रीय मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. सर्व निवड झालेल्या मंडळीचे संस्थापक डाॕ. हरिश्चंद्र बोरकर यांनी अभिनंदन केलेले आहे.