दोंडाईचा शहरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले

31

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि 14एप्रिल):- दि१३/०४/२०२१ रोजी दोंडाईचा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आंबेडकर चौक दोंडाईचा येथे आयोजित करण्यात आले. हे रक्तदान शिबीर निर्णय जनसेवा ब्लड बँक यांच्या मार्फत कॅम्प घेण्यात आला.

या कार्यक्रमाला उपस्थित दोंडाईचा पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, आरोग्य सभापती प्रतिनिधी कृष्णाभाऊ नगराळे, भारतीय बौद्ध महासभेचे मक्कण माणिक, वंचितचे धुळे जिल्हा सदस्य फकीराभाऊ थोरात, भुपेंद्र मोहिते, भारतीय बौद्ध महासभा माजी अध्यक्ष सुनिल पवार, संजय नगराळे, दिलीप माणिक, रावबाबा नगराळे, संग्राम मोहीते, विक्की पवार, रवीभाऊ महाले, सिद्धार्थ पानपाटील, लखन थोरात, सुरेश पवार, दीपक आहिरे, बबलु नगराळे, किशोर सुतारे, वैभव निकम, पृथ्वीराज पिंपळे, युवराज काकडे, ललित खंडाळे, आकाश इंदवे, गौतम नगराळे, प्रकाश भिडे, रवी अहीरे, धिरज मोहीते, शुभम मोहीते, सागर नगराळे, अजय बिऱ्हाडे, मुकेश नगराळे, मनोहर कापुरे, समाधान माणिक, दिपक रामराजे इ उपस्थित होते.

सदर रक्तदान शिबिर हे या कोरोनाच्या या काळात महत्त्वाचे असून प्रशासनाने रक्तदान करण्या करिता आव्हान केले आहे त्यात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भव्य शिबिरात एकूण ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.