नायब तहसीलदार पुरवठा अधिकारी गणेश चव्हाण यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.14एप्रिल):- येथील तहसील कार्यालयाचे पुरवठा अधिकारी गणेश चव्हाण हे गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांनी धान्याचा मोठा भ्रष्टाचार केला आसल्याची तक्रार रिपाइंचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष उत्तमराव वाव्हळे यांनी ऐका निवेदनाद्वारे राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नायब तहसीलदार पुरवठा अधिकारी गणेश चव्हाण यांनी करोणा महामारी च्या काळात मोफतचे आलेले धान्य हे आपल्या जिव्हाळ्याचा राशन दुकान दाराना गरजे पेक्षा जास्त देउन राशन दुकान दाराकडुन आर्थिक व्यवहार केला आहे मोफत धान्य वाटपाचे आलेले कमीशन देण्यासाठी 20 टक्के रक्कम दुकान दाराकडुन घेतली आहे.

ज्या दुकान दारानी कमीशन दिले नाही आशया दुकानदारा चा चुकीचा आहवाल वरिष्ठांना पाठवुन कार्यवाही करण्यात यावी आसे सांगीतले तर राशन धारकाचे शिधापत्रिका दुकानदारांनी ऑनलाईन केले आहे त्यांचे बिल सुधदा यांनी दिले नाही राशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी प्रती कार्ड पाचशे ते हजार रु ची मागणी ऑपरेटर कदम हे करीत आहेत.

पैशे घेतल्या शिवाय कार्ड ऑनलाईन करत नाहीत ऑनलाईन केलेले कार्ड मशिनवर वर्ग करण्यासाठी पुरवठा अधिकारी प्रती कार्ड दोन हजार रुपय घेत आसल्याचा आरोप करण्यात आला असून या अधिकाऱ्याने आपले कार्यालय तहसील मध्ये अवशयक आसताना आपले कार्यालय गोदामात थाटले आहे या ठिकाणाहून नच धान्याचा मोठा काळाबाजार करीत आसल्याचे निवेदनात म्हटले आहे या पुरवठा अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी आसी मागणी करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर उत्तमराव वावहळे यांची स्वाक्षरी आहे.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED