तुलानमाल गावाला जि.प. सदस्या अँड दिपालीताई मेश्राम यांची भेट

19

🔸आरोग्य परिस्थितीचा घेतला आढावा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.14एप्रिल):- ब्रम्हपुरी तालुका मुख्यालयापासुन 12 किमी अंतरावर असलेल्या 1100 लोकसंख्येच्या तुलानमाल या गावात जवळपास 70 टक्के नागरिकांना आजाराने ग्रासले होते. गावात गेल्या 8 ते 10 दिवसापासून तापाची साथ आली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासनाच्या वतीने गावात आरोग्य तपासणी शिबीर लावण्यात आले. गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले आहेत.

गावातील अनेक जण आजारी झाल्याने गावातील नागरिक भयभीत झाले आहेत.या सर्व गंभीर प्रकाराची माहिती होताच चौगान-खेडमक्ता जि.प. क्षेत्राच्या सदस्या अँड. दिपालीताई मेश्राम यांनी तुलानमाल गावाला भेट दिली. भेटिदरम्यान त्यांनी गावातील नागरिकांची आस्थेने विचारपूस केली. सोबतच आरोग्य विभाग व संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावात उपाययोजना राबविण्याच्या सुचना सुध्दा त्यांनी यावेळी दिल्या. गावातील नागरिकांना काही मदत लागल्यास ते सुध्दा आपण करणार असल्याचे त्यांनी गावातील नागरिकांना सांगितले.