कै आण्णासाहेब सार्वजनिक वाचनालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात साजरी

✒️माकेगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

माकेगाव(दि.14एप्रिल):-दि.रेणापूर तालुक्यातील माकेगाव येथे दिनांक 14/4/2021 म्हणजे देशासाठी च नव्हे तर आंतरराष्ट्राच्या विविध देशांमध्ये परमपूज्य विश्वरत्न,कायद्देपंडीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाचे व अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आव्हानाचे पालन करत आज कै आण्णासाहेब सार्वजनिक वाचनालय माकेगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची साधे पणाने 130 वी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना गावचे सरपंच प्रभाकर (बबन) त्र्यंबकराव केंद्रे व उपसरपंच प्रा. निवृत्ती लहाने यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कै आण्णासाहेब सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष माधवराव आण्णासाहेब कांबळे , सुरेश राजाराम केंद्रे,माजी सरपंच बाबासाहेब कांबळे, माणिकराव (दादा ) लहाने, चंद्रकांत कांबळे,सपना संजय कांबळे, शालूबाई कांबळे, रूक्मिणी कांबळे, ग्रंथालय चळवळीतील संजय कांबळे माकेगावकर आदींची उपस्थिती होती.ग्रंथालयाचे अध्यक्ष माधवराव कांबळे उपस्थितांचे शब्द सुमनाने स्वागत केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार संजय माकेगावकर यांनी केले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED