गंगाबाई तलमले महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.14एप्रिल):- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम रयत बहुउद्देशिय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. राकेश तलमले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मंगेश देवढगले हे होते. याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. राकेश तलमले म्हणाले की, अन्याय, अत्याचाराच्या अंधकारात अडकलेल्या शोषितांची बाबासाहेब प्रकाशवाट आहेत.

विषमतावादी व्यवस्थेवर लावलेली जोरदार चपराक आहेत. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा. कळसकर म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार सर्वकालिक व सर्वव्यापी आहेत. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मंगेश देवढगले म्हणाले की, अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यावर आधारित भारतीय समाजव्यवस्थेला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांचा आधार देऊन नवा भारत निर्माण करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांनी लिहिलेले संविधान सर्वसामान्यांना वर्तमान व भविष्याची हमी देते. या कार्यक्रमाला प्रा. श्रीकांत कळसकर, अनिल प्रधान, उमेश राऊत, कनक ठोंबरे आदी उपस्थित होते.