ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

🔸अभिवादनाला ग्रामसेवकानी मारली दांडी

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो.9307896949

कुंटूर(दि.१४एप्रिल):-घटनेने शिल्पकार, भारत रत्न भिमराव रामजी आंबेडकर यांना त्यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.पण महामानवाच्या अभिवादनाला कुंटूरचे ग्रामसेवक श्री. राजेश दमकोंडवार हे कोरोनाच्या निमित्ताने व क्वारंटाईन च्या नावाखाली गैरहजर राहणेच पसंत केले. बाबासाहेबांच्या प्रती क्रतज्ञता व्यक्त करीत असतांना ग्रामविकास अधिकार्याची मानसिकता स्पष्ट जाणवत होती.

या अभिवादनाला कुंटूर नगरीचे सरपंच प्रतिनिधी श्री. मारोती पा. कदम, उप सरपंच शिवाजी पा. होळकर, ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत पा.कदम, नागोराव पा.भोसले, बालाजी पवार, माधव डोके,दिगंबर नालीकंठे,हनमंते,शिक्षक राजू गुरुजी, पत्रकार माधव धडेकर, कारकुन शिवाजी रेनेवाड, व गणेश सांगे ईत्यादी हजर होते.

 

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED