राष्ट्र सेवा दलतर्फे महामानवाला अभिवादन

26

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.14एप्रिल):-राष्ट्र सेवा दल, शिक्षक भारती, स्वराज्य बांधकाम कामगार संघटना यांचे वतीने चिमूर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला साजरी करण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्र सेवा दल मंडळ सदस्य सुरेश डांगे, शिक्षक भारतीचे धनराज गेडाम, राष्ट्र सेवा दलाचे मनोज राऊत, आकाश भगत, विनोद सोरदे, सामाजिक कार्यकर्ते शालिक थुल, दुर्योधन मेश्राम आदी उपस्थित होते. प्रमुख अतिथींनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमाला राष्ट्र सेवा दल व शिक्षक भारती, स्वराज्य बांधकाम कामगार संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.