ग्रामपंचायत वालसरा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

✒️चामोर्शी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चामोर्शी(दि.14एप्रिल):- तालुक्यातील गट ग्रामपंचायत वालसरा व छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टा च्या वतीने कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता 14 एप्रिल 2021 रोजी ग्रामपंचायत सभागृहात अगदी साध्या पद्धतीने भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सरपंच अरुण मडावी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते अनुप कोहळे व प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य सौ.कविता कोहळे, सौ.ज्योती शेट्टीवार, सौ.शालिनी शेट्टे ,पो.पा. भगीरथ भांडेकर आदी उपस्थित होते.

बाबासाहेब आणि तमाम महामानव समजायचे असेल व त्यांचे विचार जनसामान्यांपर्यत पोचवायचे असेल तर त्यांना आधी जात आणि धर्म चौकटीच्या बाहेर काढावे लागेल असे प्रतिपादन अनुप कोहळे यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुषमा पेंदाम यांनी केले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED