महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य मानवंदना

21

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.14एप्रिल):-मौजा मोहा (इजारा) ता,पुसद येथील डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीचे औचित्य साधुन प्रथम तथागत गौतम बुध्दाच्या प्रतीमेंचे पुष्प,धुपाने,दिपाने पुजन करण्यात आले,व महामानव डॉ,बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास जमादार कुणाल रुढे व वाघमारे पोलीस कॉन्सटेबल तसेच बळवंत मनवर यांनी हारअर्पन करून मानवंदना देण्यात आली पंचशिल ध्वज फडकुन पंचशिला त्रिशरण ग्रहण करण्यात आली,त्यानंतर बाबासाहेबांच्या जिवन चरीत्र्यंवर मार्गदर्शन सौ प्रनिता तुकाराम मनवर या महीलेने केले तर सुत्रसंचालन दत्ता रंसाळ यांनी केले.

तर आभार बलवंत मनवर यांनी मानले या कार्यक्रमास अतिशय परीश्रम मंडळाचे अध्यक्ष ,कीसन इंगोले,राज कांबळे,भिमराव मनवर,अकाश बरडे,बाबाराव मनवर सतिश मनवर,संतोष मनवर,गजु जोगदडे,प्रकाश मनवर,संतोष डहाळे,सुमेध मनवर,विनोद बरडे,तुकाराम,बबन मनवर, मिस्टर मनवर,गोविदा मनवर, मारोती मनवर,राजाराम मनवर,वामन आठवले,मनाजी कराळे व गांवकरी समस्त मंडळी उपस्थीत होते पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ~~~~~~~~~~~~~~~~~~