भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

24

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.14एप्रिल):- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोणा (कोविड-19) नियमाचे पालन करून जुने बसस्थानक येथील पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच अभिवादन सभा घेऊन साजरी करण्यात आली त्याच बरोबर ग्रामपंचायत कार्यालय तलवाडा या ठिकाणी प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.

यावेळी सपोनि प्रताप नवघरे, प्रा.शाम कुंड, नजीरभाई कुरेशी, गणेश कचरे , विजय डोंगरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी सरपंच विष्णु तात्या हात्ते , उपसरपंच आज्जूभाई सौदागर, तलवाडा पोलीस स्टेशन चे सपोनि प्रताप नवघरे, जिल्हा परिषद सदस्य युवराज तात्या डोंगरे, ग्रामविकास अधिकारी मस्के साहेब, ग्रामपंचायत सदस्य,नारायण मरकड, मदन करडे, किशोर हात्ते, रघुनाथ वाघमारे (लाईनमन) अशोकराव आठवले,गणेश कचरे,प्रा,शाम कुंड सर, माऊली डोंगरे, डीपीआय जिल्हा उपाध्यक्ष मदन हातागळे,साहेबराव कुर्हाडे,मोहन डोंगरे,बाबासाहेब आठवले, पत्रकार बापू गाडेकर, अल्ताफ कुरेशी ,अशोक सुरासे, विष्णू राठोड, सुरेश गांधले, शेख अतिख, पत्रकार तथा संत रविदास प्रतिष्ठान चे संस्थापक तुळशीराम वाघमारे,सचिन डोंगरे सर, सामाजिक कार्यकर्ते नजीर कुरेशी, विजय डोंगरे सर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.यावेळी सर्वांना अल्पोपहार व चहा चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

*संत रविदास प्रतिष्ठान तर्फे जयंती निमित्त एक वही,एक पेन अभियान*

ज्यांनी भारतीय राज्य घटना लिहून देशात लोकशाही राज्य प्रस्थापित केले व शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला त्यांच्या विचारावर प्रेरित होऊन काम करणारे संत रविदास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक तथा पत्रकार तुळशीराम वाघमारे व प्रतिष्ठान च्या पदाधिकारी यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थी यांना वही,पेन देण्याचा मानस जाहीर केला.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी तुळशीराम वाघमारे यांचे व प्रतिष्ठान च्या पदाधिकारी यांचे अभिनंदन करून आभार मानले.