चंद्रपूर जिल्ह्यात (दि.14एप्रिल) रोजी 24 तासात 332 कोरोनामुक्त 1235 कोरोना पॉझिटिव्ह – 13 कोरोना बधितांचा मृत्यू

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.14एप्रिल):- जिल्ह्यात मागील 24 तासात 332 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1235 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 13 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 36 हजार 748 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 28 हजार 780 झाली आहे. सध्या 7439 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 12 हजार 440 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 69 हजार 973 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 35 वर्षीय व 45 वर्षीय पुरुष तसेच श्रीराम वार्ड येथील 70 वर्षीय महिला, झाकीर हुसेन वार्ड बल्लारपूर येथील 55 वर्षीय पुरुष, बामनी बुधोली बल्लारपूर येथील 72 वर्षीय पुरुष, मूऊ येथील 46 वर्षीय पुरुष, वरोरा शहरातील 45 वर्षीय पुरुष, भिसी चिमूर येथील 45 वर्षीय पुरुष, चिमूर येथील 55 वर्षीय महिला, जिवती येथील 45 वर्षीय महिला, अहेरी येथील 60 वर्षीय महिला, जुमाठा वार्ड वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष, केमिकल वार्ड, घुग्गुस येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 529 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 483, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 21, यवतमाळ 20, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1235 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 302, चंद्रपूर तालुका 87, बल्लारपूर 83, भद्रावती 100, ब्रम्हपुरी 98, नागभिड 39, सिंदेवाही 23, मूल 22, सावली आठ , पोंभुर्णा सहा, गोंडपिपरी चार, राजूरा 30, चिमूर 152, वरोरा 219, कोरपना 23, जीवती 17 व इतर ठिकाणच्या 22 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात आठ मृत्यूसह आज(14 एप्रिल) 305 नवीन कोरोना बाधित तर 71 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.14: आज जिल्हयात 305 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 71 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 13257 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10924 वर पोहचली. तसेच सद्या 2168 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 165 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज आठ नवीन मृत्यूमध्ये सावरगांव ता. चिमुर जि. चंद्रपूर येथील 69 वर्षीय पुरुष, तर गडचिरोली तालुक्यातील 46 वर्षीय महिला, तालुका आरमोरी जि. गडचिरोली येथील 51 वर्षीय पुरुष, तालुका ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील 60 वर्षीय महिला, तालुका अहेरी जि. गडचिरोली येथील 61 वर्षीय पुरुष, ता. भामरागड जि. गडचिरोली येथील 52 वर्षीय पुरुष, नागपूर जिल्ह्यातील 86 वर्षीय महिला तसेच ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील प्रीटर्म बेबी यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.40 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 16.35 टक्के तर मृत्यू दर 1.24 टक्के झाला.

नवीन 305 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 149, अहेरी तालुक्यातील 6, आरमोरी 28, भामरागड तालुक्यातील 5, चामोर्शी तालुक्यातील 12, धानोरा तालुक्यातील 10, एटापल्ली तालुक्यातील 10, कोरची तालुक्यातील 12, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 19, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 3, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 3 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 48 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 71 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 46, अहेरी 1, चामोर्शी 2, धानोरा 1, मुलचेरा 1,सिरोंचा 14, कोरची 2, कुरखेडा 2, तसेच वडसा 2 येथील जणाचा समावेश आहे.