खटाव तालुक्यातील उत्तर भागात वळवाचा जोरदार पाऊस- शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

33

✒️नितिन राजे(खटाव प्रतिनिधी)

खटाव(दि.15एप्रिल):-सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या या तालुक्याला उत्तर भागात आज वळवाच्या पावसाने प्रचंड नुकसान केले. दुपारी तीनच्या सुमारास प्रचंड वारा व विजेच्या गडगडाटासह गारांच्या पावसाने मोळ, पसूचा मळा, या भागात प्रचंड गारपीट झाली. यामुळे फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. गारांचा खच शेतात आणि रस्त्यावर पडलेला होता उन्हाळ्याचा तात्पुरता गारवा देणारा हा पाऊस शेतकऱ्यांच्या मनाला वनवा लावून गेला.

गारा एवढ्या मोठ्या प्रमाणात होत्या कि शेतामधील पाईपलाईन देखील त्यामुळे फुटल्या. आंबा ,शेवगा, चिकू ,यासारख्या असणाऱ्या फळबागा एकही फळ शिल्लक राहिले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तातडीची मदत द्यावी अशी मागणी शेतकरी श्याम करणे यांनी केली. काही वेळ दुष्काळ असणारा तालुक्यातील मोळ, डिस्कळ ,पसू चा मळा हा भाग जणू काय काश्मीर असल्याचे जाणवत होते.

मोळ परिसरात गाराचा ‘हॉट स्पॉट’? गेली अनेक वर्षे ज्या वेळी खटाव तालुक्यातील उत्तर भागात पाऊस होतो तेव्हा मोळ या ठिकाणी प्रचंड गारपीट होत आहे.