संविधानाची प्रत स्नेहभेट देऊन भीम जयंती अनोख्या पद्धतीने साजरी

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

ढाणकी(दि.15एप्रिल):- येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी पुढाकार घेऊन डॉ,बाबासाहेबांनी लीहलेले संविधान भारतीय संविधानाचे निर्माते तथा शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी यांचे तर्फे ढाणकी येथे पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय चव्हाण यांना जगातील सर्वश्रेष्ठ अश्या भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली.

तसेच सद्या सुरू असलेल्या कारोणा संसर्ग काळात आपल्या जीवाची पर्वा न करता वृत्तांकन करणाऱ्या जिगरबाज पत्रकार बांधवांना,आणि लॉक डाउन आणी जनता कर्फ्यु दरम्यान आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायजर वाटप करून त्यांचा सत्कार करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने त्यांच्या जयंती दिनी अभिवादन करण्यात आले,या प्रसंगी ठाणेदार यांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

गत वर्षी प्रमाणे या हि वर्षी कोराणा संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,शासनाने दिलेल्या नियना प्रमाणे अगदी सध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली,येथील जुने बसस्थानक परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व पत्रकार बांधव व पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते केक कापून सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले, या वेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशहितासाठी दिलेल्या बहुमोल योगदान आणि कार्यास उजाळा देण्यात आला.

या वेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे ,ढाणकी नगर पंचायत चे वंचित चे नगरसेवक संबोधी गायकवाड,, लड्डा घुगरे, सुमित विणकरे ,आकाश राऊत, समाधान राऊत, गोलू मुनेश्र्वर्,शाम राऊत,गुंटू राऊत,अविनाश गायकवाड,शुभम गायकवाड,रमेश कदम,पप्पू गायकवाड, रामा गायकवाड,प्रेम कदम, बालू गायकवाड, राहुल पोहरे,अजय हडसे ,अमोल कानिंदे,अभी कनिंदे,मंगेश गायकवाड,विवेक कशिनंद,जुग्गु भाई,विजू गायकवाड, संदीप विणकरे ,भास्कर राऊत,किरण भालेराव,सुमित कदम ,गज गोरटकर आदि
कार्यकर्ते उपस्थित होते’. ~~~~~~~~~~~~~~~~~~

महाराष्ट्र, यवतमाळ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED