हणेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

26

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.15एप्रिल):-ग्रामपंचायत कार्यालय हणेगाव येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विवेक सावकार पडकंठवार व उपसरपंच मुजीबोद्दिन चमकुडे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजन करण्यात आले, ग्रामविकास अधिकारी बी.जी. उमाटे साहेब यांच्या हस्ते श्रीफळ फोडून पूजन करण्यात आले.

व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामाजिक अंतर व मास्कचा वापर करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उमाकांत पंचगल्ले,वसंत आडेकर,सचिन गिरेवाड,बंडू सुर्यवंशी यांची उपस्थिती होती तर सामाजिक कार्यकर्ते किशोर आडेकर,प्रशांत माळगे,अमित आडेकर, बाळासाहेब आडेकर,काशिनाथ मदने अतिश आडेकर बालाजी मदने सचिन मदने दीपक टोके ‌वैजीनाथ मदने ग्रामपंचायत कर्मचारी माधव नामेवार रामदास बैलवाड कपील तल्लारे यांची उपस्थिती होती.