शोषित पीडित रुग्णांची सेवा करून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

🔹भिम टायगर सेनेचा स्तुत्य उपक्रम

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.15एप्रिल):-मानवी हक्काचे कैवारी, शोषितांचे उद्धारक, समाज सुधारक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत अशी जयंती माणुसकीची भिंत व सामाजिक कार्यकर्ते प्रीतम आळणे यांनी दिलेल्या आर्थिक सहकार्य मुळे व कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे साजरी केल्याचा आनंद भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी व्यक्त केला.

भारतरत्न डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांची जयंती म्हटले की दिवाळी पेक्षाही मोठा सण-उत्सव मानून मोठ्या मिरवणुकीद्वारे ढोल ताशे डीजे नाच गाण करून जयंती देश-विदेशात साजरी होताना आपण नेहमीच पाहत आलो परंतु कोरोना प्रकोप पाहू जाता मागील वर्षी व याही वर्षी अगदी शांतीने कोरोनाचे नियमाचे पालन करीत मोजक्याच लोकांमध्ये घरगुती पद्धतीने बाबासाहेबांची जयंती साजरी होत असल्याचे आपण पाहत आहोत यात आगळा वेगळा आदर्श भिम टायगर सेनेने घालून दिला आहे.

कोरोना च्या संकट काळामध्ये जयंती मोठ्या उत्साहाने, मिरवणुकी द्वारे साजरी करता आली नसली तरी मेडिकेअर हॉस्पिटल पुसद व उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील शोषित पीडित कोरोना रुग्णांना गोरगरीब गरजू रुग्णांना व नातेवाईकांना खाजगी व सरकारी रुग्णालयाच्या ठिकाणी नारळपाणी व भोजनदान करून भिम टायगर सेनेच्या वतीने रुग्ण तथा नातेवाइकांना धीर देण्याचा व कोरोनाशी लढण्यासाठी बळ देण्याचा उपक्रम राबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन केले.

हा उपक्रम राबविण्यासाठी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे, प्रीतम आळणे, अण्णा दौडके, प्रभाकर खंदारे, विनोद जाधव, दत्ता कांबळे, शेख बशीर शेख कुरेशी, अमोल मोहिते, राहुल ढोले, विलास उबाळे, संजय शेळके, कुसुमबाई खंदारे, विशाल काजळे, नारायण हगवणे, आकाश सरकटे आदींनी अथक परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED