सुवर्णमहोत्सवी शाळेत ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र आदरांजली

33

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगांव(दि.15एप्रिल):- सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, महामानव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. एन.कोळी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे.एस. पवार यांच्या हस्ते कायदेतज्ञ – अर्थशास्त्रज्ञ – विश्वरत्न – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे.एस.पवार , हेमंत माळी,व्ही.टी.माळी, एस.एन.कोळी, अशोक पाटील तसेच शाळेतील शिक्षक बंधू-भगिनी व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.