वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही जिल्हाध्यक्षानी बाबासाहेबांना अभीवादन करून जनतेना केले आवाहन

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.15एप्रिल):- जिल्हा वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पूर्व मा.लक्ष्मीकांत लोळगे आणि जिल्हाध्यक्ष पश्चिम धनंजय गायकवाड ह्यांनी यवतमाळ येथील संविधान चौक बस स्थानक येथील परमपूज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे 130 व्या जयंती निमित्त पूर्णाकृती पूतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले.

वंचीत बहुजनांचे हाती देशाच्या राजकिय सत्तेची सूत्रे यावीत ,ह्या ध्येयातून राज्य घटनेत सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाची संधी ऊपलब्ध करून देण्यासाठी विशेष तरतूद करून देशातील जनतेला समता बंधुता व न्यायाचे स्वातंत्र्य बहाल करून देणारे विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या संकल्प पूर्ती करीता देशभर अहोरात्र झटणारे वंचीत बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब वंचीत बहुजनांच्या ऊध्दारा करीता कटीबध्द असल्याचे व त्यांचा आदेश शिरोधार्य मानून आम्ही जिल्ह्यातील जनतेच्या*
*प्रश्नासाठी हाकेला धावून न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम व तत्पर असल्याचे अभिवचन ह्या प्रसंगी त्यांनी जिल्ह्यांतील जनतेला दिले*

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED