माणूस संकटात असतांना करुणा दाखवा

28

कोरोनाने माणसातील माणुसकी जिवंत झाली कि स्वार्थ वाढला.महाराष्ट्रातील माणसां बाबत भाजपाच्या नेत्यांचा विशेष फडणवीसचा स्वार्थ येवढा वाढला कि त्यांना राज्याशी व राज्यातील जनतेशी (नागरिक,मतदार) काही देणेघेणे नाही.त्याच्यातील माणुसकी आणि बांधिलकीच्या सर्वच सीमा संपल्यात अशी त्यांची वागणूक असते.कोरोनाच्या परिस्थितीत माणसावर संकट असतांना, करुणा दाखविण्याची वेळ असतांना.महाआघाडी सरकार कसे कोसळेल यांचेच स्वप्ने रात्रदिवस पाहताना दिसतात.

कोरोनाच्या भितीमुळे लोक मरतांना दिसत आहेत.कारण हॉस्पिटल मध्ये गेल्यावर रुग्णांना तपासण्या अगोदर आर्थिक परिस्थितीतीचा अंदाज घेतल्या जातो नंतरच बेड आहे कि नाही ते ठरविल्या जाते. इथेच माणुसकी दिसत नाही फक्त पैसे कमविणे हाच स्वार्थ दिसतो. डॉक्टरला देव समजून लोक त्यांच्या कडे धाव घेतात.हॉस्पिटल कत्तलखाने झाले आहेत.सर्वच नाही काही अपवादात्मक असतील त्यांचे स्वागत आहे. कारण राज्यातील शहरीभागात आणि ग्रामीण भागात अशा गंभीर लक्षवेधी घटना घडल्या नंतर ही हॉस्पिटल आणि डॉक्टर वर कडक कारवाई झाल्याची नोंद कुठे ही नाही.त्यांना स्थानिक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन वाचविले आहे.राज्याचे विरोधी पक्षनेते याबाबत कधीच पत्रकार परिषद घेऊन बोलतांना पाहिले नाही.माणूस संकटात असतांना करुणा दाखवा हे पण त्यांना सांगावे लागत असेल.तर महाराष्ट्र व मराठी माणसांचे दुर्द्व्य म्हणावे लागेल.

मुंबईत नितीन नांदगांवकर या शिवसैनिकांनी अनेक घटनावर लक्षवेधी रुग्णांना व त्यांच्या नातलगांना घेऊन पोलिसांना कारवाई करण्यास भाग पडले होते त्याचे व्हीडीवो सोशल मिडीयावर खूप मोठ्या प्रमाणत फिरत होते.मनसेचे ठाणे पालघर जिल्हा प्रमुख किशोर जाधव यांनीही अनेक हॉस्पिटल मध्ये जाऊन माणुसकी आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून बांधिलकी दाखऊन हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड केला होता. रुग्णाची आणि नातलगांची कशी फसवणूक होते ते व्हीडीवो शुटींग करून सोशल मिडीयावर दाखविले.पोलिसांनी कोणती कडक कारवाई केली यांची माहिती जनतेला झाली नाही.त्याकडे विरोधी पक्ष नेते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसतात.माणसांवरचे संकट महत्वाचे आहे कि पक्ष?.

कोरोनाची भिती दाखवून घाबरवू नका त्यांना योग्य ती माहिती द्यावी.सकारत्मक विचारांच्या माणसाला चांगल्या प्रवृतीचा समजले जाते.कोरोनाने सकारत्मक म्हणजे पॉजीटिव्ह positive करून ठेवले.नकारत्मक विचाराचा माणूस हा नेहमी वाईट प्रवृतीचा असतो.त्याला कोरोनाने निगेटिव्ह negative करून ठेवले.सत्ताधारी माणुसकी सामाजिक बांधिलकीने सकारत्मक विचाराने वागत असतांना.विरोधीपक्ष माणुसकीहीन असामाजिक तत्वाने नकारत्मक विचाराने वागतांना दिसत आहे.नागरिक किंवा मतदार दुयाय्म झाला आहे,स्वार्थ सर्वात मोठा दिसत आहे.राज्यातील नागरिकांना मतदारांना आपण फसवीत आहोत यांचे भान त्यांना नाही असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.संकटात पक्षभेद,विसरून निपक्षपाती निर्भीडपणे वागणे अपेक्षित असते.

राजकीय लोकांच्या आरोप प्रत्यारोपाच्या भानगडीत निरपराध माणस भरडली जात आहेत. सादी सर्दी खासी झाली आणि नाकातून शेंबूड वाहत असेल,तो पांढरा असेल तर घाबरण्याचे कारण नाही.जर तो पिवळा किंवा हिरवा असेल तर तुम्हाला अँटिबायोटिक्सची नितांत गरज आहे. आणि अशा अवस्थेत तुम्ही टेस्टिंगला गेलात तर १०० टक्के तुमची टेस्ट POSITIVE येणार. RTPCR चा निकाल दोन दिवसांनी येतो आणि जलद सुद्धा तुम्ही करू शकता ज्यानुसार तुम्हाला त्वरित कळेल की तुम्ही POSITIVE आहात की NEGATIVE. जर तुम्ही POSITIVE झाले असाल तर सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की तुम्ही जगातील सर्वात “फुसक्या” आजाराला बळी पडला आहात. ह्याचा इलाज जर तुम्ही सरकारी दवाखान्यातून केला तर तुम्ही विनाखर्च १०० टक्के बरे होणार आणि पैसे आहे म्हणून खाजगी रुग्णालयात केला तर मात्र तुमची खैर नाही.

आर्थिकदृष्ट्या कशी लुटमार होते ह्याचे कारण खालीलप्रमाणे आहेत.थोडे समजून घ्या.खाजगी रुग्णालयात गेल्यावर तुम्हाला सर्दी व ताप नियंत्रणात आणण्यासाठी गोळ्या औषधे आणि सलाईन दिली जातील. सरकारी रिपोर्ट वर भरोसा नाही म्हणून पुन्हा RTPCR करण्यास भाग पाडतील त्यामुळे दोन दिवसांचे बेड चार्जेस वाढतात तसेच रिपोर्ट चे ८०० रुपये भरणा करावा लागतो.रिपोर्ट आल्यावर सांगतील की त्याचा स्कोर जास्त आहे. त्यामुळे विषाणू किती खोलवर गेला हे समजण्यासाठी HTR SCAN करुन घ्या. म्हणजे गेले तुमचे २५०० रुपये. ऍम्ब्युलन्स चे १००० रुपये. हे झाले की मग तुमच्यावर आता इलाज चालू करतील.सर्दी नियंत्रणाला काही चार प्रकारच्या गोळ्या देतील,तापासाठी काही चार प्रकारचं गोळ्या देतील. सांधे दुखत असल्यास व्हिटॅमिन डी ३ च्या गोळ्या देतील आणि चव आणि वास गेला असल्यास व्हिटॅमिन क च्या गोळ्या देतील. हा म्हणजे इलाज नाही सर्वात मग तुम्हाला FABIFLUE ८०० MG च्या गोळ्यांचा कोर्स चालू करतील. ह्या FORTE प्रकारातील गोळ्यांची किंमत २५६० रुपये आहे.

एवढ्या महाग गोळ्या घेतल्या म्हणजे तुम्हाला वाटेल खरंच किती डेंजर आजार आहे. आहे कोरोना. आणि असे करत करत १५ दिवसांनी तुम्हाला घरी पाठविले जाईल.एकूण हॉस्पिटलचे बिल तीन लाख साठ हजार रुपये. मेडिकल पोलिशी असतील तर बिल आणखी वाढविल्या जाईल.आता एवढा पॉवर च्या गोळ्या शरीरात गेल्यावर त्या कुठे कुठे काम करतील याची शास्वती नाही. मात्र एक गोष्ट कोणी लक्षात घेत नाही की ह्याचा काहीतरी विपरीत परिणाम होणारच आहे. ते आता लक्षात येणार नाही,त्यांनी शरीराच्या कुठल्या भागावर काम केले हे भविष्यात कळेलच. आणि तुम्ही भावनिक होऊन डॉक्टरला हात जोडाल आणि तुम्हाला वाटेल ह्याच्या अकलेमुळे मला जीवदान मिळाले.परंतु असे काही नाही त्याने पक्के तुम्हाला वेड्यात काढून तुमचे खिसे रिकामे केले असतील.

स्मार्टमोबाईल वापरणाऱ्या मित्रांनो सांगायची गम्मत अशी की ज्या FORTE प्रकारातील गोळ्या ही धुरंदर मंडळी तुम्हाला देत आहे त्याचा निर्माता आहे GLENPHARMA कंपनी. ह्यांनी INFECTION शरीरातील दूर काढण्याकरिता ह्या गोळ्या बनविलेल्या आहे बाकी काही नाही. आपण जे म्हणतो की कोरोना वर इलाज नाही त्यावर हा उपाय एकदम बरोबर बसत आहे. त्यामुळे लोक बरे होत आहे.परंतु तुमच्या हातात १० ते २० हजार रुपये किमतीचा एक महागडा फोन असून ही तुम्ही GOOGLE वर काही खात्री करून घेत नाही आहात ही सर्वात मोठी आपली चूक म्हणावी लागेल.

देवावर विश्वास ठेवून जगणारे लोक आधुनिक तंत्रज्ञान हातात असून ही त्याचा वापर करणार नाही.खासगी आणि सरकारी यातील फरक समजून घेतला पाहिजे.तर ह्या महागड्या गोळ्या सरकारी दवाखान्यात अजिबात दिल्या जात नाही किंवा कुठल्याही प्रकारचा HTRSCAN ही काढण्यास सांगण्यात येत नाही. तर तिथे दिल्या जातात. ह्याऐवजी DOXY१ – LDR च्या गोळ्या बाहेरून घेतल्या तर ह्याचे अवघे पाकीट ९५ रुपयांना मिळते आणि रोज दोन जेवणानंतर अशा प्रकारे पाच दिवस घेतल्यास तुमचा कोरोना कुठे निघून जातो हे ही कळत नाही. आणि अगदी ठणठणीत होऊन तुम्ही फिरण्यास मोकळे.आता तुम्ही ठरवा खाजगी हॉस्पिटल मध्ये इलाज करून तीन लाखांच्यावर रुपये घालवणार की सरकारी हॉस्पिटल मध्ये इलाज करून ९५ रुपये खर्च करणार?.सरकारी हॉस्पिटल मध्ये चांगला इलाज मिळण्यासाठी नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे.वेळोवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले पाहिजे त्याच बरोबर लोकप्रतिनिधी यांचे कान धरून काम करून घेतले पाहिजे.लोकप्रतिनिधी हे स्वताला मोठे समाजसेवक समजतात त्यांना समाजाची सेवा करायची असते ते बिनपगारी नसतात.त्यांना खूप साधन व सुविधा उपलब्ध असतात.नागरिक मतदार त्यांच्या कडे कानाडोळा करतात त्यामुळेच त्यांची राजकीय घराणेशाही पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगरसेवक,आमदार खासदार लोकप्रतिनिधी म्हणून असते.

कोरोना काळात करुणा दाखविणारे लोकप्रतिनिधी शोधा.त्याच बरोबर प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी,कर्मचारी यांची योग्य ती नोंद ठेऊन त्यांचे चांगले कार्य असेल तर मानसन्मान करा.आणि चुकीचे काम असेल तर कडक कारवाई होण्यासाठी हातात पेन घेऊन जेवढे लिहता येईल ते लिहा.भविष्यात कोणते ही संकट आले तर करुणा दाखविणारे लोकप्रतिनिधी,प्रशासकीय अधिकारी कर्मचारी,डॉक्टर नर्स निर्माण होतील अथवा सर्व सार्वजनिक आरोग्य,शिक्षण,रोजगार देणारे निर्दयी लोक निर्माण होतील.अच्छे दिनचे स्वप्ने पाहणे सोडून द्या. स्वताच्या सुरक्षेसाठी स्वताच तयार व्हा!.कोरोना झाल्यावर निर्दयी होऊ नका,माणूस संकटात असतांना करुणा दाखवा.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.