मनसे कार्यालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

27

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.15एप्रिल):- मनसे कार्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली.“मनसे जिल्हाध्यक्ष” अतुल वांदिले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन केले व आदरांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कोरोना साथीच्या काळात सोशल डिस्टन्सिग, मास्क,स्वच्छता व इतर बाबीचे भान ठेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करण्यात आली.यावेळी अमोल बोरकर मनसे जिल्हाउपाध्यक्ष, जगदीश वंदिले शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष, राहुल सोरते विध्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष,शेखर ठाकरे तालुका अध्यक्ष, निखिल शेळके,स्वप्नील पांडे उपस्थित होते.