आमदार श्र्वेताताई महाले यांच्या प्रयत्नाला आले यश- चिखली कोविड रुग्णालयाचा प्रस्ताव तयार

55

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिखली(दि.15एप्रिल):- येथे सर्व सुविधांनी युक्त असे समर्पित कोविड रुग्णालय सुरू करावे यासाठी मी मागच्या वर्षभरापासून पाठपुरावा करत होते. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत येत्या सोमवारपर्यंत त्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले आहे. कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे चिखली येथे स्वतंत्र कोविड रुग्णालय निर्माण करणे आवश्यक आहे.

या बैठकीला खासदार श्री प्रतापरावजी जाधव, आमदार डॉ संजयजी कुटे, श्री संजयजी रायमुलकर, श्री संजयजी गायकवाड, श्री राजेशजी एकडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ मनीषाजी पवार, जिल्हाधिकारी श्री राममूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ भाग्यश्री विसपुते, उपजिल्हाधिकारी श्री दिनेश गीते , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री सांगळे, अन्न व औषधी प्रशासनाचे श्री घिरके व इतर अधिकारी उपस्थित होते.