महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रक्तदान करून महामानवांना अभीवादन

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगाव(दि.15एप्रिल):- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न, विश्ववंदनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त १४ एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खामगाव तालुका व शहर च्या वतीने शॅडो कॅबिनेट मंत्री विठ्ठल लोखंडकार तसेच मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य रूग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर रक्तदान शिबिराला सुरूवात करण्यात आली.

यावेळी वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवा लगर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, तालुका अध्यक्ष डॉ.सातव, शहर अध्यक्ष आनंद गायगोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आनंद गायगोळ, आकाश परकाळे, सचिन पांढरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रक्तदान करून महामानवांना अभिवादन केले. दरम्यान मनसेचे अनेक कार्यकर्ते रक्तदान करण्यास इच्छुक होते.

मात्र सामान्य रूग्णालयात रक्तसाठा पुरेसा असल्यामुळे डॉ.छाजेड यांच्च्या माहितीवरून मोजक्याच कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी आकाश पाटील, आकाश वानखडे, सागर हरसुले, वैभव देशमुख, संतोष पवार, सागर भोपळे यांच्यासह यश व एस.एन.जी. एंटरप्राईजेस युनियनचे अध्यक्ष प्रदिप निमकर्डे, सचिन मोरखडे, शिवांगी ब्रेकर्स युनियनचे अध्यक्ष गोपाल चरखे, न.प.घंटागाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष विक्की शिंदे, सचिव विनोद पाटील यासह आकाश परकाळे, आकाश खुपसे, लखन खुपसे, आकाश पारसकर, अरविंद पाचपोर, विजय वसतकार, सोनू खंडारे, सागर बावसकर, गुणवंत सुर्यवंशी, गजानन तायडे, भागवत मानमोडे, शिवदास घोगरे, प्रसन्न कापले, निखिल मांगले, अमित हट्टेल, दिपक वेरूळकर, विजय मांडवेकर, सचिन पांढरे, सुनिल शिंदे, रवि क्षिरसागर, संतोष मांडवेकर, योगेश धोटे, महेंद्र गवई, राहुल तायडे, अमोल दहिभात, विजय तायडे मनसे सैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED